मोठी बातमी! भारत-पाक युद्ध संपलं, आता 12 तारखेला नेमकं काय घडणार?

मुंबई तक

India Pakistan : भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीला लवकरच पूर्ण विराम होईल असं बोललं जातंय. अशातच परराष्ट्र सचिव मिसरी यांनी या युद्धविराम होणार आहे. तसेच पुन्हा 15 मे रोजी दोन्ही देशांतील नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय.

ADVERTISEMENT

भारत पाकिस्तान युद्धाला पूर्णविराम
भारत पाकिस्तान युद्धाला पूर्णविराम
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारत पाकिस्तान दोन्ही देशात गेल्या तीन दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

point

दोन्ही देशांमध्ये चर्चा झाल्यानंतर युद्घविरामाबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय.

point

परराष्ट्र मंत्री विक्रम मिसरी यांनी याबाबत माहिती दिलीय.

India Pakistan War: नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले की, 'आज (10 मे) दुपारी 3.35 वाजता दोन्ही देशांच्या DGMO मध्ये चर्चा झाली. आज दोन्ही देशांनी संध्याकाळी 5 वाजल्यापासून हवेत, पाण्यातून आणि जमिनीवरून होणारे हल्ले तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, 12 मे रोजी दोन्ही देशांचे अधिकारी पुढील रणनीतीवर चर्चा करतील, असे मिसरी म्हणाले.

युद्धविरामावर काय म्हणाले मिसरी? 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली यशस्वी मध्यस्थी

अमेरिकेच्या मध्यस्थीखाली दीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल ट्विट करत माहिती दिली. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर सतत ड्रोन हल्ले, गोळीबार आणि तणावपूर्ण परिस्थिती असताना, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर चिंता वाढवणाऱ्या परिस्थितीत हे पाऊल उचलण्यात आले.

दरम्यान, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की भारत आणि पाकिस्तानने तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. ते म्हणाले की, 'पाकिस्तानने नेहमीच आपल्या सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत.'

भारत आणि पाकिस्तानमध्ये अचानक घोषित झालेल्या युद्धबंदीमागे एक मोठे राजनैतिक कारण आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या अमेरिकन समकक्षांसोबत सतत चर्चेत होते. या चर्चेचा उद्देश सीमेवरील वाढता तणाव संपवणे आणि शांततापूर्ण तोडगा काढणे हा होता. जो अखेर सफल झाल्याचे पाहायला मिळालं.


हे वाचलं का?

    follow whatsapp