Vijaykumar Gavit : ऐश्वर्यावरील विधान भाजप मंत्र्याला भोवणार, महिला आयोग नोटीस प्रकरण काय?
Vijaykumar Gavit : अभिनेत्री ऐश्वर्या दररोज मासे खासची, त्यामुळे तिचे डोळे सुंदर झाले आहेत.तसे मासे खाऊन तुमचेही डोळे सुंदर होतील, असे विधान भाजप नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले होते.
ADVERTISEMENT
अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) दररोज मासे खासची, त्यामुळे तिचे डोळे सुंदर झाले आहेत.तसे मासे खाऊन तुमचेही डोळे सुंदर होतील, असे विधान भाजप नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी केले होते. शिरपूरमधील कार्यक्रमात गावित यांनी हे विधान केले होते. या संबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या विधाना प्रकरणी राज्य महिला आयोगाने विजयकुमार गावित यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (bjp vijaykumar gavit aishwarya eye statemet state commission issue notice rupali chakankar)
ADVERTISEMENT
गावितांचं विधान काय?
तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना, ती बंगळुरूच्या समुद्र किनारी राहायची. ती दररोज मासे खायची. तिचे डोळे पाहिलेत का? तसे तुमचे डोळे होणार. माशाच्या तेलामुळे डोळे चांगले राहतात, शरीराची स्किन चांगली होते. बाई माणूस चिकन दिसायला लागतात… डोळे तरतरीत दिसतात कोणी बघितलं तरी पटवून घेणार, असे विधान विजयकुमार गावित यांनी केले होते. गावित यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया समोर आल्या होत्या.
हे ही वाचा : Lok Sabha Election : राष्ट्रवादाची खेळपट्टी, हिंदुत्वाचा अजेंडा अन्…; ही आहे भाजपची स्ट्रॅटजी!
गावित यांच्या ऐश्वर्या रायवरील विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात खूप रंगली होती. अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. गावित यांनी अशा प्रकारची कमेंट करण्याऐवजी आदिवासी समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी दिला होता. मी रोज मासे खातो, तर माझे डोळे (ऐश्वर्या राय सारखे) झाले पाहिजे. मी गावित साहेबांना यालर काही संशोधन आहे का? असे विचारेन अशी प्रतिक्रिया भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली होती.
हे वाचलं का?
महिला आयोगाची नोटीस
दरम्यान विजयकुमार गावित यांना ऐश्वर्या रायवरीस विधान भोवण्याची शक्यता आहे. कारण महिला आयोगाने गावित यांना नोटीस बजावली आहे.गावित यांनी केलेले हे विधान महिलांचा अपमान करणार आहे. महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार गावित यांना नोटिस बजावली आहे. गावितांना या नोटिसीवर तीन दिवसात उत्तर सादर करायचे असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. त्यामुळे आता गावितांना या विधानावर खुलासा करावा लागणार आहे.
हे ही वाचा : CM शिंदेंना ठाण्यावरून घेरलं, आता मंत्र्यालाही झापलं! महायुतीत अजित पवारच ‘दादा’?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT