ठाकरेंनी वाघ नखाचा मुद्दा तापवला, शरद पवारांनी विरोधाची धारच काढली, म्हणाले…
राज्यात ठाकरेंनी हा मुद्दा तापवून सत्ताधाऱ्यांना घेऱण्याचा प्रयत्न केला असताना शरद पवारांनी मात्र यावर मवाळ भूमिका घेतली आहे.यावर शरद पवार म्हणाले, राज्य सरकार ही वाघनखं तीन वर्षासाठी आणणार आहे. मला त्यामधलं काही ज्ञान नाही.
ADVERTISEMENT
Shivaji Maharaj Wagh Nakh Controversy : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखे ही लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असून ती परत आणण्याची घोषणा महायुती सरकारने केली आहे. यासाठी आज रात्रीच सुधीर मुनगंटीवार वाघनखं आणण्यासाठी ब्रिटनला जाणार आहेत. पण, ही वाघनखं खरी आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण ही वाघनखं खरी नसल्याचा दावा (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी केला होता. तसेच सरकारकडे या संबंधित कोणतेच दस्तावेज नसून, जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता. कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या वाघनखासंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एकीकडे राज्यात ठाकरेंनी हा मुद्दा तापवून सत्ताधाऱ्यांना घेऱण्याचा प्रयत्न केला असताना शरद पवारांनी मात्र यावर मवाळ भूमिका घेतली आहे. (chhatrapati shivaji maharaj tiger claw controversy ncp sharad pawar reaction aditya thackeray indrajit sawant oppose)
ADVERTISEMENT
शरद पवार रविवारी जुन्नरमध्ये होते.यावेळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना वाघनखा संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर शरद पवार म्हणाले, राज्य सरकार ही वाघनखं तीन वर्षासाठी आणणार आहे. मला त्यामधलं काही ज्ञान नाही. पण इंद्रजित सावंत हे मराठी भाषेतील इतिहासाचे जाणकार आहेत. त्यांच काही वेगळं मत असेल तर त्याचा विचार केला पाहिजे असे शरद पवार म्हणाले आहेत. वाघनखाविषयी मला काहीही माहिती नाही. त्याबाबत वाद निर्माण करावा असेही मला वाटत नसल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे शरद पवार यांनी हे वक्तव्य करून ठाकरेंच्या या मुद्यावरील विरोधाची हवाच काढली आहे.
हे ही वाचा : Sai Baba Temple : शिर्डीत साई भक्तांची फसवणूक! बनावट देणगी पावती प्रकरण काय?
इंद्रजित सावंत काय म्हणाले?
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या वाघनखासंदर्भात म्हटलं आहे की, अफजल खानाच्या वधाच्या वेळेला जी वाघनखे नावाचं शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलं ते शस्त्र कुठलं आहे आणि कुठे आहे याविषयीची स्पष्टता इ.स. 1919 पर्यंत होती. हे शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होतं. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. मात्र आता जे व्हिक्टोरिया अण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे सरकार भारतात परत आणत आहेत ती अफजल खानाचा वध केलेली वाघनखे नाहीत, हे स्पष्ट आहे.
हे वाचलं का?
दरम्यान सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी रात्री ही वाघनखं आणण्यासाठी ब्रिटनला जाणार आहेत. ही वाघनखं फक्त तीन वर्षासाठी भारतात आणली जाणार आहेत. त्यानंतर सातारा, नागपूर आणि कोल्हापूर येथे देखील या नखाचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
हे ही वाचा : धक्कादायक! भाजपच्या महिला नेत्याने घरात घेतला गळफास
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT