CM शिंदेंनी डिवचलं, ‘तुमची मर्सिडीज रिक्षावाल्यांने खड्ड्यात घातली, नादी लागू नका…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra gram panchayat election result 2023 cm eknath shinde reaction criticize uddhav thackeray
maharashtra gram panchayat election result 2023 cm eknath shinde reaction criticize uddhav thackeray
social share
google news

Maharashtra Political News : रिक्षावाला म्हणून हिणवत होते, पण याच रिक्षाने तुमची मर्सिडीज खड्डयात घातली आहे. ही सर्वसामान्य माणसांची रिक्षा आहे, नादी लागू नका, ही आग आहे, असा थेट इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. तसेच ही सर्वसामान्य लोक, रिक्षा-टॅक्सीवाले, भाजीवाले, टपरीवाले, चहावाले यांनाच घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना मोठी केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री शिंदे वर्धापण सोहळ्यात बोलत होते.(cm eknath shinde criticize ubt udhhav thackeray on shivsena anniversary meeting)

मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून शेती करायला जातात, असा आरोप ठाकरे करतात, तर शेतकऱ्याचे मुलाने हेलिकॉप्टरमध्ये बसू नये, शेतकऱ्याच्या मुलाने चांगल्या गाडीतून फिरू नये, अशा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना केला आहे. मी मुख्यमंत्री म्हणून हेलिकॉप्टरने जातो, पण गावात गेल्यानंतर शेतकरी म्हणून शेती करतो, असे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. अरे मी गाडीतून जेव्हा जातो, तेव्हा फायली घेऊन जातो सह्या करायला. हा मुख्यमंत्री गाडीत, रस्त्यात, मंत्रालयात, ठाण्यात सही करतो. तुम्ही सरकार चालवायचे सोडून गाडी चालवत होतात, असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला. तसेच आतापर्यंतच्या इतिहासात अडीच वर्षात सह्या झाल्या होत्या, तेवढ्या सह्या किंवा त्यांच्यापेक्षा किती पटीने एका दिवसात सह्या करून टाकल्या. कारण अगोदरचे मुख्यमंत्री पेणच ठेवत, नव्हते माझ्याकडे दोन दोन पेन आहेत, असे देखील शिंदे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : फडणवीसांचा हास्यजत्रेतला प्रयोग, अन् अवली लवली, उद्धव ठाकरेंची टीका

पवारांच्या पुस्तकातला किस्साच वाचला

मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी शरद पवार यांच्या लोक माझ्या संगाती या पुस्तकातला किस्साच सभेत वाचून दाखवला. अडीच वर्षात दोनदाच मुख्यमंत्री मंत्रालयात गेले, हे पचणी पडणार नव्हतं, घरी बसून सरकार चालवता येत नाही.मुख्यमंत्र्याना राज्यात काय चाललंय हे कळत नव्हतं. याचा अंदाज घ्यायची क्षमता मुख्यमंत्र्यांमध्ये असायला पाहिजे होती, हे मी नव्हे तर शरद पवार त्यांच्या पुस्तकात सांगत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधला फरक देखील सांगितला. बाळासाहेब सर्वांना सवंगडी, सहकारी मानायचे. तु्म्ही आम्हाला घरगडी समजता, नोकर समजता,बाळासाहेब आणि तुमच्यामध्ये हाच फरक होता, असे देखील शिंदे यांनी आरोप केले आहेत. बाळासाहेबांनी ज्या मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले, सर्वसामान्य माणसाला मुख्यमंत्री केले, तेव्हा भर व्यासपीठात शिवतिर्थावरून त्यांच्य़ा विरूद्ध कारस्थान करून अपमान करून त्यांना भर सभेतून उतरून घरी जायला लावायचं पाप तुम्ही केलंत, असे कुठला पक्षाचा प्रमुख करत असतो, असा आरोप देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर केला.

हे ही वाचा : BMC: उद्धव ठाकरेंना घेरलं, ‘त्या’ प्रकरणी फडणवीसांकडून प्रचंड मोठी घोषणा

अरे इतके लोक चालले आहेत, त्याचे आत्मपरीक्षण तरी करा, सगळ्यांनी खोके घेतले,अरे लाखो लोक आले, इतके खोके कुठून येतील. सगळे खोके कुठे गेले हे महाराष्ट्रासमोर, देशासमोर आल्याशिवाय राहणार नाही, असे देखील शिंदे म्हणाले आहेत. तसेच जेव्हा एक नोटीस आली होती तेव्हा गेला तिकडे मोदींना भेटायला, शिष्टमंडळ बाहेर ठेवलं आणि शिष्टाई गेली, आता हे काय आम्हाला माहिती नाही, सगळ माहिती आहे. आपल्या मर्यादेत राहा, कुवतीत राहा, असा सल्ला देखील मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT