‘शरद पवार किंगमेकर नव्हे तर…’, देवेंद्र फडणवीसांची टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

devendra fadnavis criticize sharad pawar on morning oath ceremony with ajit pawar
devendra fadnavis criticize sharad pawar on morning oath ceremony with ajit pawar
social share
google news

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या युतीच्या सरकारला उद्या वर्षपुर्ती होत आहे. यानिमित्त डीडी नॅशनल चॅनेलला देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठे गौप्यस्पोट करत पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले आहे. शरद पवार किंगमेकर नाही तर ते किंग ब्रेकर नेते असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ही गोष्ट बरोबर आहे ते एक अनुभवी नेते आहेत, मात्र सरकार पाडण्यात त्यांनी प्रभुत्व मिळवलं आहे, असा टोला देखील फडणवीसांनी लगावला आहे. (devendra fadnavis criticize sharad pawar on morning oath ceremony with ajit pawar)

ADVERTISEMENT

पहाटेच्या शपथविधीवर देखील देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे. निवडणूकीआधीच पंतप्रधान मोदी, अमित शाह, जे पी नड्डा यांनी आम्ही निवडून आलो तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनणार असे ठरले होते. त्यानुसार युतीतून आम्ही लढलो आणि निवडून देखील आलो. पण खुर्चीसाठी त्यांनी (ठाकरेंनी) आमची साथ सोडली. साथ तर सोडात फोनवरही बोलणे बंद केले.त्यामुळे मला वाटते रस्ते आम्ही नाही तर त्यांनीच बंद केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा : ‘पवारांच्या तोंडून सत्य.. गुगलीमुळे माझ्याऐवजी त्यांचे पुतणेच..’, फडणवीसांचा पलटवार

उद्धव ठाकरेंनी आमची साथ सोडून पाठीत खंजीर खुपसला.त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आमच्यासोबत सत्तास्थापनेची तयारी दर्शवली. आम्ही शरद पवार यांच्यासोबत देखील चर्चा केली. शरद पवार यांनीही याला मंजूरी दिली. शरद पवार यांच्या मंजुरीनंतरच मी आणि अजित पवार यांनी सर्व गोष्टी ठरवल्या असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर अचानक शरद पवार यांनी माघार घेतली. या माघारीचे कारण त्यांनी सांगावे, असे देखील फडणवीस म्हणाले आहेत. पण अजित पवार यांनी पुढाकार घेऊन आम्ही शपथ घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जी केस झाली त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय़ आला त्याप्रमाणे अजित पवारचे नेत्यांची आमदारकी रद्द झाली असती. म्हणून ते परत पक्षात गेले. त्यामुळे हा कोणताही अपघात नव्हता, संपुर्ण प्लान केला होता त्यानंतर त्याला अपघात ठरवले गेले, असा गौप्यस्फोट देखील फडणवीसांनी केला.

हे वाचलं का?

हे ही वाचा : ‘ती जाहिरात म्हणजे मूर्खपणा होता…’, अखेर देवेंद्र फडणवीस मनातलं बोललेच!

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT