"त्याच्या पापाचा घडा भरला"; शरद पवारांवर प्रहार, फडणवीसांचं कौतुक; राणेंच्या Video त काय?
अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली. शरद पवारांना हा निकाल धक्का देणारा ठरला. हा निकाल आल्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय?
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकालावर नीतेश राणेंचं ट्विट
नीतेश राणे शरद पवारांबद्दल काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीसांचं भाजप आमदाराकडून कौतुक
Nitesh Rane Tweet On Sharad Pawar : "त्याला चितपट करू शकेल असा वस्ताद महाराष्ट्राच्या पटावर अवतरला. आणि त्याची एक एक चाल मोडीत काढून त्याच्या काळ्या साम्राज्याचा ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या गेल्या", असे म्हणत भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं. तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला मिळालं. स्थापनेपासून पक्षाचे अध्यक्ष असलेल्या शरद पवारांसाठी हा मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहे. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनीही या निकालावर भाष्य केलं.
शरद पवारांचा एकेरी उल्लेख, फडणवीसांचं कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर निवडणूक आयोगाने निकाल दिला. त्यानंतर भाजप आमदार नीतेश राणे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. बॉस असं नीतेश राणेंनी व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. नीतेश राणे हे देवेंद्र फडणवीस यांचा बॉस म्हणून उल्लेख करत असतात. या व्हिडीओतून पवारांना फडणवीसांनी कसं चितपट केलं, याबद्दलचं वर्णन आहे.
हे वाचलं का?
व्हिडीओ पहा
या व्हिडीओत म्हटलं आहे की, "सगळे म्हणायचे की या महाराष्ट्रातील त्याचा पॅटर्न कुणीच मोडून काढू शकत नाही. कारण विकृत जातीयवादी कारस्थान आणि घराणेशाहीचा चिखल नेहमीच त्याच्या पथ्यावर पडतो. स्वतः स्वार्थासाठी लोकांना वापरायचे आणि गरच संपली की फेकून द्यायचंय."
"सख्खा भाऊ असो की, पुतण्या... सत्तेसाठी कुणीही आपला न परका. पण अखेर त्याच्या पापाचा घडा भरला. राज्याच्या पटावर देवेंद्र अवतरला. अटलजींचं सरकार पाडणाऱ्यांचा हिशोब चुकता केला."
ADVERTISEMENT
"आता कितीही चवताळले, कितीही फडफडले तरी सगळ्यांच्याच मुसक्या आवळल्या गेल्यात. कारण जिहाद्यांचं लांगुनचालन आणि हिंदूंचं खच्चीकरण करणाऱ्यांनाच बुलडोजर लागलाय. पूर्वी ते म्हणायचे की अकेला देवेंद्र क्या कर पायेगा, आता सगळेच म्हणताहेत अकेला देवेंद्रही काफी है", असं म्हणत या व्हिडीओतून शरद पवारांवर टीकेची तोफ डागण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT