जयंत पाटलांचं वर्मावर बोट, देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा डिवचलं; नक्की काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis Criticize Jayant Patil
Devendra Fadnavis Criticize Jayant Patil
social share
google news

Devendra Fadnavis Criticize Jayant Patil : कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी हा साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असल्याची टीका केली होती.या टीकेनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फडणवीसांच्या वर्मावरच बोट ठेवलं होतं. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी ‘राष्ट्रवादी हा महाराष्ट्र व्यापी पक्षच नाही,अशी टीका करून जयंत पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. (devendra fadnavis reply jayant patil and sharad pawar karnataka assembly election)

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आज अमरावती दौऱ्यावर होते.अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात खरीप पूर्व हंगामाची आढावा बैठक त्यांनी घेतली.या बैठकीनंतर पत्रकारांना त्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. जयंत पाटील यांनी फौजदाराचा हवालदार आणि राष्ट्रवादी राज्यातला मोठा पक्ष होणार असल्याचा प्रतिक्रिया दिली होती. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले,अशा प्रकारचे स्वप्न त्यांनी 2014 आणि 2019 ला पाहिले त्यांच स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. कारण राष्ट्रवादी हा महाराष्ट्र व्यापी पक्षच नाही, असा टोलाच त्यांनी राष्ट्रवादीला लगावलाय.

तसेच सध्या शरद पवार (Sharad Pawar) यांना आपला पक्ष टिकवण्यासाठी एक संघ ठेवण्यासाठी, जी कसरत करावी लागते आहे, ती कसरत पाहिल्यानंतर इतर पक्षावर बोलावं की नाही बोलावं याचा त्यांनी विचार करावा, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला.

हे वाचलं का?

‘भाजपने फौजदाराचा हवालदार केलाय’

काल पर्वा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री इकडे येऊन गेले. आणि त्यांनी सांगितले, राष्ट्रवादी हा साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असल्याची माहिती सुरुवातीला जयंत पाटील यांनी दिली. आता हे कोणी सांगाव, जे कोणी साडेतीन जिल्ह्याचा पक्ष राष्ट्रवादी म्हणत असतील, त्यांचा भारतीय जनता पार्टीने फौजदाराचा हवालदार केलाय,आणि आता आमची माप काढत आहेत.त्याला स्वत:चे स्थान टीकवता आले नाही अशी टीका करत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फडणवीसांच्या वर्मावरच बोट ठेवलं.

‘साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष’

देवेंद्र फडणवीस यांची निपाणी येथे सभा झाली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा एक पक्ष आहे. या पक्षाने आता इथे अख्ख्या कर्नाटकमध्ये त्यांचा एक उमेदवार दिला आहे. तो उमेदवार इथे (निपाणी) आहे. इथे येऊन हा पक्ष काय डोंबलं करणार आहे? खरं म्हणजे ही यांची मिली जुली कुस्ती आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिली जुली कुस्ती सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पॅक करून पाठवून द्या, आम्ही पाहून घेऊ”, अशी टोलेबाजी फडणवीसांनी केली होती

ADVERTISEMENT

शरद पवार काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचाराला गेले ही बाब चांगली नाही. सीमाभागातील लोकांनी खूप सोसलं आहे. त्यांना जर समजले की महाराष्ट्र त्यांच्या बाजूने नाही तर त्याला अतीव दुःख होईल”, असं पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT