‘कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार’, जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार असल्याची घोषणा मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.यानिमित्त मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
ADVERTISEMENT
छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून आपल्या सगळ्यांना प्रेरणा, एक आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांचं बलिदान आहे हे कोणी विसरू शकणार नाही. त्यामुळे मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार असल्याची घोषणा मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.यानिमित्त मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. (eknath shinde announced coastal road will be named chhatrapati sambhaji maharaj)
शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा पाया रचला आणि संभाजी महाराज (Sambhaji maharaj) यांनी त्याला कळस चढवला. छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक पराक्रम केले आहेत, त्यामुळे त्यांच्या शोर्याच्या आठवणी आपण जतन करणे गरजेचे असल्याचेही मत मु्ख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी नोंदवले.
हे ही वाचा : ‘मविआ बैठकी’त शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले कर्नाटकने…
छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या कार्यकाळात 120 लढाया लढल्या, मात्र त्यांचा कधीही पराभव झाला नाही. तसेच जगात कुठेही नसतील असे जलदुर्ग त्यांनी बांधले. हीच प्रेरणा घेऊन नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नौदलाच्या झेंड्यावर राजमुद्राला स्थान दिले असल्याचेही मु्ख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच त्यांच्या आठवणी जपण्यासाठी, खाणाखुणा जपण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या त्या कतृत्वासमोर आणि शोर्यासमोर त्या छोट्याच ठरतील, असे देखील ते म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यामुळे आमचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर आम्ही प्रथम तो निर्णय घेतला. मागच्या सरकारने अल्प मतात आल्यावर घाई घाईने निर्णय घेतला होता. पण त्यानंतर अधिकृतपणे आपण त्याला परवानगी दिली असल्याचेही देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगत ठाकरेंवर टीका केली.
मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!
16 मार्च 2023 रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती आणि आज… https://t.co/QvApZi6JSZ pic.twitter.com/XGCtCpcblg— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 14, 2023
ADVERTISEMENT
हे ही वाचा : महाविकास आघाडीची तातडीची बैठक, जयंत पाटलांनी सांगितलं काय ठरली स्ट्रॅटजी?
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार! 16 मार्च 2023 रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती आणि आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यासंदर्भातील घोषणा त्यांनी केली, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा सुद्धा उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले आहे. ही छत्रपती संभाजी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आज जयंतीदिनी अनोखी आदरांजली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT