बाळासाहेबांच्या शिवसेनेचं शिवधनुष्य कसं पेलणार? एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

साहिल जोशी

ADVERTISEMENT

eknath shinde talks on shiv sena future
eknath shinde talks on shiv sena future
social share
google news

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी एक विधान केलं होतं. ‘शिवसेनेचे धनुष्य फक्त बाळासाहेबांना पेललं. ते नंतर उद्धव ठाकरेंना पेललं नाही आणि एकनाथ शिंदेंना पेलेल का, हे बघावं लागेल’, असं राज यांनी म्हटलं होतं. राज यांच्या याच विधानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुंबई Tak बैठक’मध्ये उत्तर दिलं.

ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटलांनी विधान केल्यानंतर तुम्ही फोन करून सांगितलं हे काही बरोबर नाही. तुम्हाला असं वाटतं का की भाजपच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या विधानामुळे वादविवाद होतात? या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “चंद्रकांतदादांना मी स्वतः फोन केला आणि सांगितलं की, बाळासाहेबांना बाजूला करून अयोध्येचा मुद्दा पूर्ण होऊ शकत नाही. बाळासाहेबांनी पाठिंबा दिला. तेव्हा हिंदू म्हणायला लोक घाबरायचे, गर्व से कहो हम हिंदू है असा नारा त्यांनी दिला.”

एकनाथ शिंदेंनी चंद्रकांत पाटलांना फोन करून  काय सांगितलं?

अयोध्येच्या मुद्द्यासंदर्भात बाळासाहेबांनी कडक भूमिका घेतली होती. ते जाहीरपणे म्हणालेले की ज्यांनी कुणी केलं त्यांचा मला अभिमान आहे. त्यांच्यावर असं बोलण्याची गरज नाही. पण, चंद्रकांत पाटील मला म्हणाले की, मी तात्काळ पत्रकार परिषद घेतो. बाळासाहेबांबद्दल माझं असं म्हणणं नाही. आता जे बोलताहेत त्यांच्याबद्दल मला बोलायचं होतं, असं ते म्हणाले”, अशी माहिती शिंदेंनी यावेळी दिली.

हे वाचलं का?

शिवसेनेचे धनुष्य कसं पेलणार? शिंदेंनी दिलं उत्तर

राज ठाकरे म्हणाले की, शिवधनुष्य पेलणं फक्त बाळासाहेबांना जमलं. यापुढे ते जमेल की नाही हे बघावं लागेल. तुम्ही याकडे कसं बघता? एकनाथ शिंदे म्हणाले, “शिवधनुष्य पेलणं म्हणजे काय की, जे बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं काम. त्यांना अपेक्षित असलेलं काम काय? तर सर्वसामान्य माणसांना न्याय मिळाला पाहिजे. मुंबईतील चाळीतील लोकांना हक्काची घरे, चांगले रस्ते, मुंबई चांगली झाली पाहिजे, बाहेरून येणाऱ्या लोकांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती.”

“हे विकासाचं शिवधनुष्य आहे. राज्य सुफलाम करता आलं पाहिजे. लोकांना वाऱ्यावर सोडता काम नाही. या राज्याचा विकास झाला पाहिजे. पायाभूत कामं झाली पाहिजे. आम्ही तेच करतोय. शिवधनुष्य विकासाचं. सगळीकडे विकास आम्ही करतोय, जे बाळासाहेबांना अपेक्षित आहे तेच आम्ही करतोय”, असं शिंदे म्हणाले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य’; देवेंद्र फडणवीसांचं ‘मुंबई Tak बैठक’मध्ये मोठं भाकित

“आम्ही त्यांच्यासारखं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. आमचं सरकार स्थापन झालं, तेव्हा निवडणुका होत्या का? आम्ही आल्या दिवसापासून काम सुरू केलं. आम्ही कुणालाही वैयक्तिक लाभ होईल असे निर्णय घेतले नाही. मी छातीठोकपणे सांगतो की, मी आणि देवेंद्रजींनी लोकहिताचा घेतला”, असं शिंदे म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT