Jalana Maratha Morcha : महायुतीचे संकटमोचक जालन्यात, गिरीश महाजनांनी घेतली मनोज जरांगेची भेट, काय तोड़गा निघाला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

girish mahajan meet manoj jarange appeal to stop protest jalana antarvali sarati
girish mahajan meet manoj jarange appeal to stop protest jalana antarvali sarati
social share
google news

महायुती सरकारच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज जालन्याच्या अंतरावली गावात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत साधाऱण तासभर महाजन आणि जरांगे यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर गिरीश महाजन यांनी जरांगे यांच्याकडे एक महिन्याची मुदत मागितली आहे. तसेच त्यांना उपोषण मागे घेण्याची देखील विनंती केली आहे. मात्र मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. (girish mahajan meet manoj jarange appeal to stop protest jalana antarvali sarati)

ADVERTISEMENT

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी मनोज जरांगेची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी गिरीश महाजन यांनी मनोज झरांगेच्या मनधरणीचा प्रयत्न केला. मात्र ते आंदोलनांतर ठाम होते. तब्बल तासभर चर्चा झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांना चर्चेमागचा तपशील सांगितला.

हे ही वाचा : Pune crime : जेवण बनवण्यावरून झाला वाद, नंतर कोयत्याने वार करुन…

गिरीश महाजन म्हणाले, मनोज जरांगेची मागणी न्याय आहे, पण त्यांनी आम्हाला एक महिन्याची वेळ द्यावी,अशी सरकारची मागणी आहे. मात्र मनोज जरांगे यांनी दोन दिवसात निर्णय घेण्यास सांगितले आहे. पण मला वाटतं याला कुठे कायदेशीर आधार राहणार नाही. कारण जर आपण बळजबरीने जीआर काढला, तर तो एक दिवसावर टीकणार नाही. अन्यथा कुणी कोर्टात गेले तर तो रिजेक्ट होईल. त्यामुळे आपल्याला जर खरंच कायमस्वरूपी न्याय द्यायचा असेल, दोन दिवसाचा आग्रह धरू नका,असे आवाहन गिऱीश महाजन यांनी केले आहे.

हे वाचलं का?

आम्ही चार वर्ष मेहनत घेतली, हायकोर्टात टीकलो, सरकार बदललं आणि लगेच त्याची काय अवस्था झाली, सुप्रीम कोर्टाने फेटाळलं, असे देखील गिरीश महाजन यांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला एक महिन्याची वेळ द्यावी, समीतीसमोर पुन्हा आपलं म्हणण मांडू आणि आपली बाजू मांडून हक्क मिळवून देऊ असे आश्वासन गिरीश महाजन यांनी मनोज जरांगेला दिले आहे. आपण तब्येतीची काळजी घ्यावी, थोडा वेळ आम्हालाही द्यावा. आम्ही पाठपुरावा करून मुंबईत थांबून हा विषय तडीस नेऊ,असे देखील गिरीश महाजन यांनी मनोज जरांगेना आश्वासन दिले आहे.

हे ही वाचा : Baramati : आई-वडिलांनीच काढला मुलाचा काटा, त्रासाला कंटाळून दिली हत्येची सूपारी

“आमचे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आहे. याची खात्री बाळगा… योग्य आरक्षणासाठी जीआर तयार करण्यासाठी एक महिन्याचा वेळ द्यावा, असे आवाहन महाजन यांनी मनोज झारंगे व ग्रामस्थांना केले आहे, तसेच जीआर तयार होईपर्यंत मुंबई, मंत्रालय सोडणार नाही आणि विषय तडीस नेऊ,असे देखील गिरीश महाजन यांनी आश्वासन दिले आहे. दरम्यान या आश्वासनानंतरही मनोज जरांगे आंदोलनावर ठाम आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT