Exit Poll : मध्य प्रदेशात शिवराज सिंहांची कमाल, कसं फुलवलं कमळ?

ADVERTISEMENT

india today axis my india exit poll analysis Madhya Pradesh Shivraj Singh Chauhan will bring victory to BJP but Kamal Nath is likely to lose
india today axis my india exit poll analysis Madhya Pradesh Shivraj Singh Chauhan will bring victory to BJP but Kamal Nath is likely to lose
social share
google news

India Today Axis My India Exit Poll : मध्य प्रदेशात भाजप क्लीन स्वीप करणार आहे. येथे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh Chauhan) पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) भाजप मोठ्या जनादेशासाठी सज्ज आहे. 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार असला तरी त्याआधीच एक्झिट पोलच्या ट्रेंडमुळे राजकीय समीकरणे आणि गोळाबेरजेच्या गणितामुळे चर्चांना प्रचंड वेग आला आहे. मध्य प्रदेश निवडणुकीत I.N.D.I.A आघाडीमध्ये फूट पडल्याने काँग्रेस (Congress) आणि कमलनाथ यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. तर त्याचवेळी बहुजन समाज पक्ष आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी यांनीही आपले उमेदवार उतरवल्यामुळे याचा फायदा भाजपला होणार आहे.

भाजपला प्रचंड बहूमत

राज्यात 230 जागा असून सरकार स्थापन करण्यासाठी 116 जागांची आवश्यकता आहे. त्यावर आता इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोलने सांगितले आहे की, मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करू शकते. या निवडणुकीत भाजपला 140-162 जागा जिंकण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भाजपबरोबर लढत करत आहे. या पोलनुसार काँग्रेस 68-90 जागा मिळवू शकते असं सांगण्यात आले आहे. कारण पोलच्या अंदाजानुसार भाजपला 152 तर काँग्रेसला 76 जागांचा अंदाज आहे.

हे ही वाचा >> ‘दुसऱ्यांच्या घरात धुणीभांडी…’ ठाकरेंची Cm शिंदेंवर जोरदार टीका

मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही?

भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सत्ताविरोधी लाटेलाही त्यांनी तेवढ्याच ताकदीने लढत दिली आहे. सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या सर्वाधिक 36 टक्के लोकांनी शिवराज सिंह यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. तर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ मात्र त्यांच्या मानाने ते कितीतरी मागे आहेत. कारण फक्त 30 टक्के लोकांनीच कमलनाथ यांना पसंती दिली आहे. इतर एक्झिट पोलनेही मध्य प्रदेशात भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. पोलस्ट्रॅट सर्वेक्षणात काँग्रेसला भाजपपेक्षा किंचित आघाडी मिळण्याचा अंदाज आहे. कारण 5 एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजपला 130 तर काँग्रेसला 98 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य प्रदेश निवडणुकीत महिलांनी भाजपला प्रचंड मतदान केल्याचे एक्झिट पोल सांगतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 शिवराज सिंह चौहान मैदानात

यामुळे शिवराज सिंह चौहान यांच्या कष्टाला फळ मिळाल्याचेही मत व्यक्त होत आहे. मागील निवडणुकांपेक्षा यावेळी त्यांनी अधिक प्रयत्न केले असल्याचेही त्यांनी स्वतःच मान्य केले आहे. मात्र भाजपने या निवडणुकीत येथे मुख्यमंत्री पदाचा चेहरा मात्र जाहीर केला नाही. शिवराज चौहान यांनी मैदानात उतरले आणि निवडणुकीच्या कामाला लागले. त्यांनी भव्य सभा आणि रोड शो आयोजित केले. त्यांनी प्रत्येकाला डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी प्रचंड प्रयत्न केले.

भाजप बहुमताच्या जवळ

महिलांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अनेक योजना आणल्या आणि त्यांनी त्या तशा पद्धतीने राबवल्याही. विशेषत: लाडली बेहन योजनेची प्रचंड चर्चा झाली. कारण एक्झिट पोल आल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, ही काही काटे की टक्कर अशी लढत नव्हती, मात्र लाडली बेहननेच विरोधकांचा काटा काढला असल्याचे मतह त्यांनी व्यक्त केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सभांमुळेच भाजप बहुमताच्या जवळ गेल्याचेही त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

काँग्रेसला हानी

या 5 राज्यांमध्ये निवडणुकीपूर्वी विरोधकांची एकजूट असल्याची बढाई मारणारे प्रमुख पक्षही आता एकाकी पडले आहेत. त्यामुळे काँग्रेसलाही मध्य प्रदेशात जागावाटपाचाही फॉर्म्युला गाठता आला नाही. त्यामुळे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उघडपणे पदभार स्वीकारला आणि काँग्रेसला हानी पोहोचवण्यात आणि सपाच्या उमेदवारांच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही.

ADVERTISEMENT

इंडिया आघाडीत बिघाडी

अखिलेश यादव यांनी तर काँग्रेस नेत्यांना सरळ सरळ देशद्रोही म्हणून संबोधले होते. कमलनाथ आणि दिग्विजय यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली होती. तर त्याचवळी त्यांनी काँग्रेसला सावध करत निवडणुकीत धडा शिकवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अखिलेश यादव या निवडणुकीत भाजपसोबत असल्याचे त्यांचे ते चित्र अगदीच बोलके दिसले. त्यांच्या याच राजकारणामुळे या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पाटणा, बेंगळुरू आणि मुंबईत विरोधी पक्षांची महाआघाडीचे चित्र दिसले तर त्यानंतर मात्र राज्यांच्या निवडणुकीत एकमेकांवर आक्रमकपणे टीका झाल्याचेही सगळ्यांना दिसून आले. त्यांच्या याच आक्रमकपणामुळेच सपा-काँग्रेस-आम आदमी पार्टी या तिन्ही पक्षांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा >> ‘राजीनामा परत घेण्यासाठीचं आंदोलन पवारांच्याच आदेशावरून’, अजित पवारांचा खळबळजनक खुलासा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT