राज्यपालांनी सरकार पाडायला मदत केली? सिब्बलांचं कोर्टात कोश्यारींकडे बोट
Supreme court Hearing on Maharashtra Political Crisis, kapil sibal Arguments on Bhagat Singh Koshyari : 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यासह महाराष्ट्रातील सत्तासर्घषाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरू आहे. सरन्यायाधीश (Chief Justic of India) डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे (Thackeray Faction) वकील कपिल सिब्बल (Kapil sibal) हे […]
ADVERTISEMENT
Supreme court Hearing on Maharashtra Political Crisis, kapil sibal Arguments on Bhagat Singh Koshyari : 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यासह महाराष्ट्रातील सत्तासर्घषाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरू आहे. सरन्यायाधीश (Chief Justic of India) डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे (Thackeray Faction) वकील कपिल सिब्बल (Kapil sibal) हे कायद्यांचा दाखल देत नियमांवर बोट ठेवत युक्तिवाद करताना दिसले. युक्तिवादावेळी कपिल सिब्बल यांनी तत्कालीन राज्यपाल (Governor Of Maharashtra) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या भूमिकांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले. (Kapil sibal Arguments on former Governor Bhagat Singh Koshyari’s decisions while Supreme Court Hearing on Maharashtra Political Crisis)
ADVERTISEMENT
Bhagat Singh Koshyari : राज्यपालपद सोडल्यानंतर कोश्यारींची स्फोटक मुलाखत
16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टात असतानाच भगतसिंह कोश्यारी यांनी अपात्रतेच्या यादीत नाव असलेल्या एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण देत मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. ठाकरे गटाचे वकील सिब्बल यांनी याच मुद्द्यावर बोट ठेवलं. सिब्बल सुप्रीम कोर्टात म्हणाले, “पहिलाच प्रश्न असा उपस्थित होतो की, ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे, अशा लोकांना राज्यपाल शपथ देऊ शकतात?”
हे वाचलं का?
“ज्यांना अपात्रतेची नोटीस आलेली आहे, अशा परिस्थितीत राज्यपालांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे? अपात्रतेची कार्यवाही प्रलंबित आहे, याची कल्पना राज्यपालांना होती. अशा स्थितीत राज्यपाल जर त्यांना (एकनाथ शिंदे) मुख्यमंत्री पदाची शपथ देत असतील, तर राज्यपाल सरकार पाडण्यात मदत करत आहेत”, असं सिब्बल कोर्टात म्हणाले.
पहाटेच्या शपथविधीबद्दल कोश्यारींचा गौप्यस्फोट; अजित पवारांचं नाव घेत म्हणाले,…
ADVERTISEMENT
राज्यपालांनी घटनात्मक जबाबदारीची चौकट ओलांडली -सिब्बल
कपिल सिब्बल असंही म्हणाले की, “अलिकडच्या काळात राज्यपालांनी त्यांच्या घटनात्मक जबाबदारीच्या पलीकडे जाऊन काम केले आहे. अलिकडच्या काळात राज्यपाल सक्रिय राजकारणात गुंतले आहेत आणि हे दुर्दैवी आहे.”
ADVERTISEMENT
ठाकरेंचं पत्र कोश्यारींच्या जिव्हारी! सांगितलं 12 आमदारांच्या फाईलचं सत्य
पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आला… सिब्बल म्हणाले…
2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार स्थापन झालं होतं. हे सरकार बहुमत सिद्ध करण्याआधी तीन दिवसांतच कोसळलं. कपिल सिब्बल यांनी या मुद्द्यावर बोट ठेवत राज्यपालांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. सिब्बल म्हणाले, “एखाद्याकडे बहुमत आहे की, नाही हे माहीत नसताना राज्यपाल त्यांना सकाळच्या वेळी शपथ कशी देऊ शकतात?”, असा सवाल सिब्बल यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयावर उपस्थित केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT