kasba Peth: हेमंत रासने की रवींद्र धंगेकर, पाच फॅक्टर ठरवणार कोण जिंकणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

kasba peth assembly bypolls 2023, Hemant Rasane Vs ravindra dhangekar : कसबा पेठ मतदारसंघात २५ वर्षांनी दुसऱ्यांदा पोटनिवडणूक होतेय. त्यावेळी गिरीश बापटांचा पराभव करून काँग्रेसचे वसंत थोरात विजयी झाले होते. पण आता शिवसेनेतील बंड आणि सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीला एखाद्या सार्वत्रिक निवडणुकीचं रूप आलंय. भाजपकडून हेमंत रासने, तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर उमेदवार आहेत. दोघेही माजी नगरसेवक राहिले आहेत आणि ओबीसी समाजातून येतात. दोघांसाठीही बड्याबड्या नेत्यांनी पोटनिवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावलीये. पण कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होणार हे ठरवण्यात पाच फॅक्टर महत्त्वाचे आहेत. (kasba Peth assembly bypoll major factor)

ADVERTISEMENT

ब्राह्मण समाजाची नाराजी

कसबा पेठ मतदारसंघ तसा ब्राह्मणबहुल म्हणून ओळखला जातो. आणि ब्राह्मण मतदार हे भाजपचे पारंपरिक मतदार ओळखले जातात. गेल्या २५ वर्षांपासून इथले आमदार ब्राह्मण समाजातले राहिलेत. पण पहिल्यांदाच भाजपने ब्राम्हणेत्तर समाजातल्या व्यक्तीला तिकीट दिलंय. त्यामुळे ब्राम्हण मतदार भाजपवर नाराज असल्याचं वेळोवेळी समोर आलं. मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक यांनीही तसे संकेत दिले होते. त्यामुळे हा हक्काचा पारंपरिक मतदार विरोधात गेल्यास किंवा मतदानाला न उतरल्यास त्याचा भाजपला मोठा फटका बसू शकतो.

हे वाचलं का?

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक 2023 : जात विरुद्ध हिंदुत्व

देवेंद्र फडणवीसांनी प्रचाराच्या शेवटी हिंदुत्वाचं कार्ड काढलं. हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी निवडणूकच नसल्याचंही ते म्हणाले. पुण्येश्वर मंदिराचा मुद्दाही फडणवीसांनी काढला. भाजपसाठी हिंदुत्व हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. एक प्रकारे सत्तांतरानंतर भाजपच्या हिंदुत्वाची टेस्ट या पोटनिवडणुकीत होणार आहे. रासने हे हिंदुत्वाचा प्रभाव असलेल्या इलाख्यातून येतात. तर धंगेकर हे कसबापेठेसारख्या अठरापगड जातींचा प्रभाव असलेल्या भागातून येतात. दोन्ही उमेदवार ओबीसी समाजातून येतात. पण शेवटच्या क्षणी हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात आल्यामुळे वेगळ्या प्रकारचं ध्रुवीकरणही इथे बघायला मिळू शकतं. त्यामुळे जात प्रभाव ठरते की धर्म यावरही जय-पराजयाचं गणित अवलंबून आहे.

Maharashtra Politics : ठाकरे-फडणवीसांची जवळीक वाढतेय?

ADVERTISEMENT

सदाशिवपेठ विरुद्ध कसबापेठ

हेमंत रासने यांचा सदाशिवपेठ, शनिवारपेठ, गुरुवारपेठ अशा पेठांमध्ये प्रभाव आहेत. तर कसबापेठ, शुक्रवारपेठ, रास्तापेठ, नाना पेठ इलाख्यात रवींद्र धंगेकरांचा प्रभाव आहे. गेल्या २५ वर्षांपासून सदाशिव पेठ इलाख्यालाच प्रतिनिधित्व मिळत आलंय. दुसरीकडे मतदारांमध्ये ५०-६० टक्क्यांहून अधिक वाटा असलेल्या कसबापेठेला प्रतिनिधित्वापासून वंचित राहावं लागलंय. हा संघर्षही या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने समोर आला. धंगेकरांच्या रूपाने पहिल्यांदाच कसबा पेठेतल्या उमेदवाराने तगडी लढत निर्माण केलीय.

ADVERTISEMENT

हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर : मविआची एकी आणि मनसे फॅक्टर

मविआमध्ये अडीच वर्षांच्या सत्ताकाळात दिसली नाही, एवढी एकी दिसली. कसब्यात सगळेच एकदिलाने काम करताना दिसले. दुसरीकडे मनसेनं भाजपला पाठिंबा दिलाय. मनसेचे मतदारही निर्णायक आहेत. गेल्यावेळी भाजपच्या मुक्ता टिळकांना ७५ हजार, काँग्रेसच्या अरविंद शिंदेंना ४७ हजार, सेना बंडखोर विशाल धनवडेंना १४ हजार आणि मनसेच्या अजय शिंदेंना ८ हजार मतं मिळाली. विशाल धनवडे हे सध्या ठाकरे गटात आहेत. कधीकाळी आपले सहकारी असलेल्या धंगेकरांसाठी काही मनसैनिकही प्रचाराला उतरलेत. त्यामुळे मविआच्या मतांमधली एकजूट आणि मनसे मतदारांचं धंगेकरांना पाठबळ मिळाल्यास भाजपसाठी निवडणूक जड जावू शकते.

Sachin Sathe: चिंचवड पोटनिवडणुकी आधी मविआला झटका, काँग्रेस नेता भाजपत

कसबा पेठ पोटनिवडणूक : मतदानाची टक्केवारी

पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी हा सगळ्यात कळीचा मुद्दा राहिलाय. ब्राह्मण समाजाच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी घटली तर हा फॅक्टर जय-पराजयात निर्णायक ठरू शकतो. पावणेतीन लाख मतदार असलेल्या कसब्यात गेल्यावेळी ५१ टक्के मतदान झालं होतं. यंदा मतदान रविवारी आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीतला मतदानाचा ट्रेंड बघता कोण मतदान करून घेऊ शकतं, यावरच विजयाचं गणित अवलंबून आहे. तसंच ब्राह्मण समाजाच्या नाराजीसोबत नोटाच्या फॅक्टरचीही चर्चा खूप झाली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT