Maratha Reservation : एकनाथ शिंदेंनी पाठवला बंद लिफाफा, जरांगेंच्या भेटीनंतर खोतकर म्हणाले…
Maratha reservation शिंदे सरकारच्या वतीने बंद लिफाफ्यातील जीआर घेऊन मंत्री अर्जुन खोतकर आज दुपारी जालन्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी हा बंद लिफाफा मनोज जरांगे पाटलांकडे सूपूर्द केला. यानंतर अर्जुन खोतकर यांची मनोज जरांगे पाटलांसोबत काही मिनिटे चर्चा झाल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर सरकारची भूमिका मांडली.
ADVERTISEMENT
शिंदे सरकारच्या वतीने बंद लिफाफ्यातील जीआर घेऊन मंत्री अर्जुन खोतकर आज दुपारी जालन्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी हा बंद लिफाफा मनोज जरांगे पाटलांकडे सूपूर्द केला. यानंतर अर्जुन खोतकर यांची मनोज जरांगे पाटलांसोबत काही मिनिटे चर्चा झाल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर सरकारची भूमिका मांडली. मनोज जरांगे पाटलांचा लढा यशाच्या दिशेने जात आहे. आता जरांगे पाटील जो निरोप आणि बदल सुचवतील, तो मुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल, असे अर्जुन खोतकर यांनी सांगितले. (manoj jarange patil continue agitation arjun khotkar close envelop maratha reservation)
ADVERTISEMENT
मनोज जरांगे पाटील जितके उपोषणात आहेत, तितकाच मी देखील उपोषणात आहे. त्यामुळे मी जरांगे पाटलांचे निरोप सरकार दरबारी पोहोचवत असल्याचे अर्जुन खोतकर यांनी माध्यमांना सांगितले. खोतकर पुढे म्हणाले, सरकारने रात्री नवा जीआर काढलाय. यासाठी रात्री अडीच वाजेपर्यंत बैठका पार शे खवावा अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा होती, त्यामुळे तो बंद लिफाफ्यातून त्यांच्याकडे सूपूर्द केल्याची माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली.
हे ही वाचा : Chandrayaan 3 Vikram lander New Image : रात्री कसा दिसतो विक्रम लँडर, चांद्रयान-2 ऑर्बिटर पाठवला फोटो
मनोज जरांगे पाटलांचा लढा यशाच्या दिशेने जात आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत, त्यासाठी सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेत असा आग्रही मुद्दा धरला आहे. त्यामुळे ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्याबाबत अभ्यास करण्यासाठी वेळ मागून घेतली. छत्रपती संभाजीनगरमध्ये बसून समितीने काही काळ थांबावे असा आदेश मुख्यमंत्र्यांचा होता. त्य़ामुळे समिती समितीचे काम करतंय,अशी माहिती अर्जुन खोतकर यांनी आंदोलकांना दिली.
हे वाचलं का?
तसेच 2004 चा जीआर सरकारने काढला होता, पण त्याची अंमलबजाणीच होत नव्हती. कुणबी प्रमाणपत्र दिले जात नव्हते. त्यामुळे या जीआरमध्ये ता़तडीने सुधारणा केली जाणार, याबाबत शुक्रवारी चर्चा झाली. हा जीआर अत्यंत प्रभावीपण राबवल्या जाव्यात असे आदेश दिलेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील जो निरोप आणि बदल सुचवतील, तो मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला जाईल, असे अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम
मनोज जरांगे पाटलांच्या शिष्टमंडाळासोबत मुंबईत शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली होती. या बैठकीनंतर आज दुपारी बंद लिफाफ्यातील जीआर अर्जुन खोतकर यांनी सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटलांकडे सूपूर्द केला. हा जीआर पाहिल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी या बंद लिफाफ्यातील जीआरमध्ये काहीच दुरूस्त्या झाल्या नसल्याचे सांगितले. तसेच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे तसा यात उल्लेख देखील नसल्याचे जरांगे पाटील यांनी आंदोलकांसमोर उघड केले. त्यामुळे सरकारने या दुरूस्त्या कराव्यात व आमरण उपोषण हे सुरुच राहणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Crime News : महिलेने डॉक्टरचा कापला प्रायव्हेट पार्ट, नंतर तो पाठवला पत्नीला
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT