राज ठाकरेंचं ठरलं! महायुतीला देणार पाठिंबा? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय

ADVERTISEMENT

political
NDA
social share
google news

MNS-BJP: लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी राजकीय पक्षांनी मात्र जोरदार तयारी सुरू केली आहे. बिहारमध्ये (Bihar) नुकतेच नितीशकुमार (Nitishkumar) यांनी पलटी मारल्यामुळं आता नवं समीकरण तयार झालं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आता महाराष्ट्रातही दिसून येत आहे. राज ठाकरे भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

राज भाजपसोबत इच्छूक

याआधी उद्धव ठाकरे यांचा भाजपबाबत एक मवाळ भूमिका होती.  तर दुसरीकडे आता राज ठाकरेही भाजपसोबत जाण्यास इच्छूक असल्याचे दिसून येत आहे. 

हे ही वाचा >>मोठी बातमी! शरद पवारांच्या पक्षाला आता नवं नाव

 फडणवीसांची भेट 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेत्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मनसेला फायदा

या भेटीविषयी बोलताना सूत्रांनी सांगितले की, जागावाटपाच्या पुढच्या चर्चा करण्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितिन देसाई यांच्याकडे आता जबाबदारी दिल्याचेही सांगण्यात येत आहे. 

मर्यादित अवकाश

आगामी निवडणुकी राज ठाकरे आणि भाजपमध्ये युती झाली तर त्याचा सर्वाधिक फायदा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच होण्याची शक्यता आहे. 
मनसेसाठी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही मर्यादित अशीच आहे.

ADVERTISEMENT

भाजप-मनसे युती

त्यामुळे भाजपच्या तुलनेत मनसे पक्ष हा कमकुवत असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपने राज ठाकरेंसाठी युतीची तयारी दाखवली तर मात्र त्याचा खरा फायदा हा राज ठाकरे यांनाच होणार आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात बदल होणार

महाराष्ट्रात सध्या शिंदे-फडणवीस आणि अजित पवार असे महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे यंदा यांनी एकत्रित निवडणुका लढवल्या तर मात्र हे भाजपसोबत निवडणुका होण्याचं चित्र हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात दिसणार आहे. 

जागा वाटपावर लक्ष

लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष कंबर कसणार आहेत. त्यामुळे  लोकसभेच्या एकूण 48 जागा आणि विधानसभेच्या 288 जागांबाबत निर्णय काय होणार याकडेच साऱ्यांच लक्ष लागून राहिले आहे.

हे ही वाचा >>Narendra Modi : 'काँग्रेसमुळे स्वातंत्र्यानंतरही देश गुलामगिरी...'

    follow whatsapp

    ADVERTISEMENT