Shiv Sena: उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली, धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनाच!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shiv sena symbol bow and arrow allotted to Shinde group: नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shiv Sena) नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Bow and Arrow) एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा झटका बसला आहे. शिवसेना कुणाची याचा निर्णय अखेर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. (party name shiv sena and the party symbol bow and arrow will be retained by the eknath shinde faction)

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली. होय, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारा फैसला अखेर सुनावला. निवडणूक आयोगातील कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. निवडणूक आयोगाने शुक्रवारी सायंकाळी हा निर्णय दिला. निवडणूक आयोगाचा निर्णय हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का असून, आता ठाकरे काय भूमिका घेणार? सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावणार का? हे पाहावं लागेल.

जूनमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यांच्याबरोबर सुरुवातीला 16, तर 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात विरोधात बंड केलं. या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटाने खरी शिवसेना आम्हीच असल्याचा दावा केला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडूनही असाच दावा करण्यात आला होता.

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत पक्षाच्या कार्यकारिणीत बदल केले. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. शिंदेंनी शिवसेनेवर दावा करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये, असं म्हटलेलं होतं.

Exclusive: शिवसेना कोणाची? ‘निवडणूक आयोग लाखो प्रतिज्ञापत्र बघत नाही’, माजी आयुक्तांची मुलाखत

ADVERTISEMENT

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी गोठवलेलं शिवसेना नाव आणि चिन्ह

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पक्षावर दावा ठोकण्याची चढाओढ सुरू असतानाच अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले होते. निवडणूक आयोगाने त्यानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवलं. त्यानंतर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि तलवार-ढाल हे निवडणूक चिन्ह दिलं होतं. तर उद्धव ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह दिलं होतं.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंना मोठा झटका, शिंदेंचा विजय

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांकडून युक्तिवाद करण्यात आला. त्याचबरोबर पदाधिकारी, कार्यकारिणीतील सदस्य यांची शपथपत्रेही निवडणूक आयोगात सादर करण्यात आली होती. दोन्ही गटांचा युक्तिवाद झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग काय निकाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्यानंतर आज आयोगाने निकाल दिला. हा निकाल उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. उद्धव ठाकरेंच्या हातून पक्ष गेला असून, कायदेशीर लढाईत एकनाथ शिंदेंनी बाजी मारली आहे.

शिवसेना नक्की कोणाची?, उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी?

ठाकरेंसमोर एकच पर्याय…

केंद्रीय निडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह दिलं आहे. आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा मिळाला असून, ठाकरेंसमोर मर्यादित पर्याय उरले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ शकतात. निवडणूक आयोग स्वायत्त असला, तरी आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत. त्यामुळे ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार की नव्या नावाने पक्षाची नोंदणी करून निवडणुकीच्या तयारीला लागणार हे बघावं लागेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT