मुख्यमंत्रिपद! शरद पवारांना चुकीचा निर्णय घेतल्याचा पश्चाताप: प्रफुल्ल पटेल

मुंबई तक

ADVERTISEMENT

praful patel exclusive interview with Mumbai Tak Chavadi
praful patel exclusive interview with Mumbai Tak Chavadi
social share
google news

Mumbai Tak Chavadi : शरद पवार यांनी मोठा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी दोन व्यक्तींची निवड केली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर शरद पवारांनी जबाबदारी सोपवली. नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मुंबई Tak चावडीवर हजेरी लावली. यावेळी त्यांनी भूतकाळातील एका निर्णयावर महत्त्वाचं भाष्य केले.

ADVERTISEMENT

मुंबई Tak चावडीवर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, “2004 मध्ये मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आले असते, तर अजित पवारच मुख्यमंत्री झाले असते, असं नाही. त्यावेळी तर अजित पवार उपमुख्यमंत्रीही नव्हते. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ होते. नंतर विजयसिंह मोहिते झाले. आणखी काही जण झाले आणि नंतर अजित पवारांचा नंबर लागला.”

ताणून धरलं असतं तर आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळालं असतं

“मला असं वाटतं, इतकंच नाही तर शरद पवारांनाही नंतरच्या काळात असं वाटतं की, त्यावेळी वेगळा निर्णय घेतला असता तर… स्वाभाविक आहे. काँग्रेससोबत वाटाघाटी करण्याची जबाबदारी शरद पवारांनी माझ्यावर सोपवली होती. आता मला वाटतं की, आम्ही थोडं ताणून धरलं असतं, तर आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं”, असं प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

हेही वाचा >> शरद पवारांचं केसी राव यांच्या ‘बीआरएस’बद्दल मोठं विधान; म्हणाले…

“2004 मध्ये यूपीए अस्तित्वात आली होती. त्यानंतर ती पहिली निवडणूक होती. केंद्रातील सत्तेत आम्ही गेलो होतो. आता शरद पवारांना आणि मलाही असं वाटायला लागलं की, त्यावेळी आम्ही मुख्यमंत्रीपद घेतलं असतं, तर आम्ही काँग्रेस आणि इतर पक्षांच्या फार पुढे गेलो असतो”, असं भाष्य पटेल यांनी पहिल्यांदाच केलं.

हेही वाचा >> ‘बेडकांना हत्तीच्या मालकाचाच आशीर्वाद ‘, शिवसेनेचे (UBT) स्फोटक भाष्य

ते पुढे असेही म्हणाले की, “उपमुख्यमंत्रीपद कमी नाही, पण सरकारचा चेहरा म्हणून मुख्यमंत्रीपदाचा प्रोजेक्ट केला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतले असते तर आमचा पक्ष फार पुढे गेला असता. अनेक घटनाक्रम होत असतात.”

ADVERTISEMENT

ज्यांच्या जास्त जागा त्यांच्या मुख्यमंत्री

प्रफुल्ल पटेल असंही म्हणाले की, “स्वाभाविक आहे की, ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री. 2004 मध्ये आमचे 71 आमदार होते आणि काँग्रेसचे 69. आताही महाविकास आघाडीत आम्ही तोच फॉर्म्युला स्वीकारला होता. पण, त्यावेळी कोणताही उद्देश नव्हता. पण, त्यावेळी आम्ही मुख्यमंत्रिपद घेतले असते, तर आम्ही खूप पुढे गेलो असतो.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT