Raj Thackeray : ''संदीप खरंच हिरा आहे, वरळीचं व्हिजन...'', मनसेचा आदित्यविरोधात उमेदवार ठरला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

raj thackeray appreciate sandeep deshpande work he may fight election against aditya thackeray shiv sena ubt worli constituency
मनसेचा आदित्यविरोधात उमेदवार ठरला?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संदीप खरंच हिरा आहे

point

राजकीय दृष्ट्या तो अत्यंत जागृत आहे

point

आज त्याने वरळी व्हिजन ठेवलं आहे

Raj Thackeray News : सौरभ वक्तानिया, मुंबई  :  गेल्या काही दिवसांपासून वरळी मतदार संघातून आदित्य ठाकरेंविरोधात मनसे संदीप देशपाडे यांना मैदानात उतरवेल अशी चर्चा होती. त्यात आज राज ठाकरे यांच्या विधानानंतर या चर्चांना आणखीण बळ मिळालं आहे. कारण ''संदीप खरंच हिरा आहे. राजकीयदृष्ट्या तो अत्यंत जागरूक आहे. आज त्यानेच हा वरळी व्हिजन ठेवला आहे'', असे विधान राज ठाकरेंनी करून एकप्रकारे आपल्याच उमेदवाराची वरळीच्या जनतेशी ओळख करून दिली आहे. त्यामुळे पुतण्या आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरे संदीप देशपांडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार अशी चर्चा सूरू झाली आहे.  (raj thackeray appreciate sandeep deshpande work he may fight election against aditya thackeray shiv sena ubt worli constituency)

ADVERTISEMENT

वरळीत आज मनसेकडून वरळी व्हिजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. ''संदीप खरंच हिरा आहे. राजकीय दृष्ट्या तो अत्यंत जागृत असलेला मुलगा आहे. अनेक विषयावर बोलणारा आहे. एखाद काम होणार असेल तर हो म्हणून सांगतो, नाही होणार असेल तर नाही म्हणून सांगतो. आज त्याने वरळी व्हिजन ठेवलं आहे, असे कौतूक राज ठाकरे वरळीच्या जनतेसमोर संदीप देशपांडे यांचे केले. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : ''लाडकी बहीण योजना डिसेंबरमध्ये बंद होणार''

राज ठाकरे पुढे म्हणाले, उद्या जेव्हा बाहेरून लोक येऊन वरळीचं मातेरं होईल तेव्हा पश्चातापाचा हात डोक्यावर मारू नका. बाकीच्या सगळ्या निघून जातील कोणी हाताला लागणार नाही. पण आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. जे चांगलं काम करत आहे ते त्यांच्या पाठीवर शाबासकी पडणार आहे की नाही? आणि ज्यांनी हा सर्व राजकीय सामाजिक गोंधळ घालून ठेवला आहे त्यांच्या पुन्हा पाठीवर शाबासकीची थाप पडणार असेल तर काय बोलायचं? आमच्याकडून जेवढे प्रयत्न करायचे असतील तेवढे शंभर टक्के प्रयत्न होणार असा विश्वास देखील राज ठाकरेंनी वरळीच्या जनतेला दिला.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Mumbai University : 'उद्याच निवडणूक घ्या...', मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर हायकोर्टाचे आदेश

मालवण पुतळा दुर्घटनेवर काय म्हणाले? 

मागे एक विषय काढला होता की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधणार आहेत. विशेष म्हणजे तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा हा एकमेव राज ठाकरे होता की, समुद्रात महाराजांचा पुतळा बांधू नका, आधी महाराजांचे गड किल्ले दुरुस्त करा, असे मी म्हटले होते. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुतळा बांधला त्याचं काय झालं,  आपल्याला अजून जमिनीवर पुतळे बांधता येत नाही आणि समुद्रात पुतळा बांधायला चालले होते, असे म्हणत नाव न घेता राज ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT