NCP: शरद पवारांच्या कारवाईवर प्रफुल पटेल स्पष्टच म्हणाले, ‘नाही….”

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar clear action against sunil tatkare and praful reaction maharashtra politics
sharad pawar clear action against sunil tatkare and praful reaction maharashtra politics
social share
google news

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल पटेल (Praful Patel) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर शरद पवार यांनी सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांचे नाव पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे. या कारवाईवर आता प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांची कारवाई लागू होत नसल्याची प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली आहे. एकीकडे शरद पवार यांची कारवाई लागू होत नसल्याचे प्रफुल पटेल बोलत असताना दुसरीकडे पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवारच असल्याचे देखील पटेल बोलताना दिसत आहे. (sharad pawar clear action against sunil tatkare and praful reaction maharashtra politics)

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीच्या शपथविधीनंतर काही संघटनात्मक निर्णय़ घेण्यासाठी उप मुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भूजबळ आणि सुनील तटकरे यांनी पत्रकार परीषद बोलावली होती.या पत्रकार परीषदेत शरद पवारांचा निर्णय लागू होतो की नाही, असा सवाल विचारण्यात आला होता.यावर प्रफुल पटेल म्हणाले, नाही… यामागचे कारण म्हणजे, आमच्या निर्णयाला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बहुसंख्य लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. लोकशाहीमध्ये बहुमताने घेतलेला निर्णय वैध आहे. कोणी त्याला बदलू शकते असे नाही, असे प्रफुल पटेल म्हणाले आहेत. तसेच असा वाद होऊ नये अशी आमचीही इच्छा आहे. आणि आम्ही मनापासून त्यासाठी प्रयत्न देखील करणार आहोत, हे वाद होता कामा नये, असे देखील प्रफुल पटेल म्हणाले आहेत.

आमच्याकडे आमदार असल्याशिवाय अजित दादांची शपथ झालीच नसती, आम्ही पक्ष आहोत म्हणून आम्ही संख्या सांगत नाही. जे लोक पक्षावर अधिकार सांगत आहेत, त्यांनी सांगाव त्यांच्याकडे किती लोक आहेत, असे थेट आव्हानच प्रफुल पटेल यांनी यावेळी दिले. तसेच बहुसंख्य आमदार आमच्यासोबत म्हणून अजित पवार उप मुख्यमंत्री म्हणून इथे बसले आहेत समजलं का, असा दम देखील अजित पवार यांनी भरला.

हे वाचलं का?

शरद पवारांची मनधरणी करणार का असा सवाल पत्रकारांनी विचारला होता. यावर प्रफुल पटेल म्हणाले, आमची शरद पवारांना हात जोडून विनंती आहे की, पक्षाचे बहुसंख्य आमदार, वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेचा त्यांनी आदर करावा, असे पटेल यांनीआवाहन केले आहे. याचसोबत शरद पवारांचा आशिर्वाद आमच्यावर आणि पक्षावर असावा अशी आमची इच्छा आहे, असे देखील प्रफुल पटेल म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT