शरद पवारांच्या गुगलीनंतर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष सिल्व्हर ओककडे…
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझ्या सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली. या त्यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे बड्या नेत्यांसह कार्यकर्ते भावूक झाले होते.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझ्या सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली. या त्यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे बड्या नेत्यांसह कार्यकर्ते भावूक झाले होते.यावेळी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.तब्बल अनेक तास मनधरणी करून सुद्धा शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. या सर्व घडामोडीनंतर आता शरद पवार व्हाय बी सेंटरवरून सिल्व्हर ओकवर म्हणजेच त्यांच्या निवासस्थानी निघाले आहे. आता याच निवास स्थानावरून शरद पवार राजीनामा मागे घेणार का? की आपल्या भूमिकेवर ठाम राहणार याचा निर्णय़ येणार आहे.या निर्णयाकडे आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (sharad pawar political retirement Will Pawar withdraw resignation from silver oak)
ADVERTISEMENT
शरद पवार यांनी अचानक निवृत्तीची घोषणा करताच राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठा धक्का बसला. शरद पवार यांच्या या निर्णय़ानंतर अनेक नेत भावूक झाले होते. यामध्ये अजित पवार वगळता अनेकांनी पवारांच्या निर्णय़ानंतर आपली भूमिका मांडत राजीनामा मागे घेण्याची मागणी केली होती. तर अजित पवार यांनी शरद पवारांच्या निर्णय़ स्विकारल्याचे त्याच्या प्रतिक्रियेतून दिसून आले होते. तब्बल दीड तास राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. या सर्व घडामोडीत प्रफुल पटेल यांनी शरद पवार राजीनामा मागे घेतील की नाही?यावरील निर्णय़ सिल्व्हर ओकवर होईल अशी माहिती दिली. शरद पवार यांच्याशी आता राष्ट्रवादीचे बडे नेते चर्चा करणार आहे.या चर्चेनंतर मोठा निर्णय़ येण्याची शक्यता आहे.
शरद पवार आता व्हाय बी सेंटरवरून सिल्व्हर ओकच्या दिशेने निघाले आहेत. सिल्व्हर ओकवर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार देखील दाखल झाले आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेणार आहे. तसेच सिल्व्हर ओकवर शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये सायंकाळी बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे बडे नेते शरद पवार यांची पुन्हा राजीनामा मागे घेण्यासाठी मनधरणी करणार आहेत.आता या बैठकीकडे राष्ट्रवादीसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT