'भारत दहशतवादाचा पुरस्कर्ता नसून..', युद्धविरामानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
Sharad Pawar : युद्धविरामानंतर केवळ देशातूनच नाहीतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऑपरेशन सिंदूर या युद्घविरामानंतर ट्विट करत प्रतिक्रिया दिलीय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारत पाकिस्तान या दोन्ही देशांत गेली तीन दिवसांपासून युद्ध सुरू होतं.

अमेरिकेनं मध्यस्ती करत दोन्ही देशातील युद्धविरामाची घोषणा केलीय.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.
Sharad Pawar : भारत पाकिस्तान या दोन्ही देशांत गेली तीन दिवसांपासून युद्ध सुरू होतं. या युद्धविरामासाठी अमेरिका युद्धाच्या पहिल्या दिवसांपासून युद्धविरामासाठी आवाहन करत होते. आज (10 मे) दुपारी 3.35 वाजता दोन्ही देशांच्या DGMO मध्ये चर्चा झाली. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे परराष्ट्र सचिव विवेक मिसरी यांनी युद्धविरामाबाबत ट्विट केलं. त्यानंतर आता राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिलीय.
शरद पवार यांचं युद्धविरामावर ट्विट
गेल्या तीन दिवसांपासून भारत पाकिस्तान या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आता शरद पवार यांनी पाकिस्तानवर केलेली कारवाई आणि ऑपरेशन सिंदूरबाबत ट्विट केलंय. ज्यात भारत दहशतवादाचा पुरस्कर्ता नसून ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतानं केवळ दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली असल्याचं सांगत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
हे ही वाचा>> Ind vs Pak युद्ध थांबताच IPL चाहत्यांसाठी खास बातमी, BCCI करणार मोठी घोषणा
पुढे त्यांनी पाकिस्तानाकडून सातत्यानं होणाऱ्या कुरघोड्यांबाबत निर्णायक उत्तर देण्यात आलं असल्याची माहिती दिली. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर पाकिस्तानी लष्करांनी सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती असं त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून सांगितलं.
दरम्यान, त्यांनी ट्विटद्वारे पुढे सांगितलं की, भारत हा नेहमीच शांततेचं समर्थन करतोय. काही घडामोडी घडत असतील तर त्याचं स्वागत आहे. त्यानंतर त्यांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर पाऊल उचलणं हे आंतरराष्ट्रीय समुदायाचं सामूहिक कर्तव्य असल्याचं ट्विटमध्ये नमूद केलं. शांतीच्या दिशेनं टाकलेलं पाऊल हे दहशतवाद्याच्या विरोधात सामूहिक लढ्यांच बळ वाढवतं, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
हे ही वाचा>> मोठी बातमी! भारत-पाक युद्ध संपलं, आता 12 तारखेला नेमकं काय घडणार?
दरम्यान, हे युद्ध थांबले जरी असले तरीही येत्या 12 मे रोजी दोन्ही देशांतील नेते एकमेकांशी संवाद साधतील. त्यानंतर या एकूण परिस्थितीवर अटी आणि शर्थी ठेवत दोन्ही देशांमध्ये विचारविनिमय होईल, असं मिसरी यांनी सांगितलं आहे.