Narendra Modi: राष्ट्रवादी फुटली तरीही शरद पवार मोदींच्या सत्काराला का जातायेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार दिला जाणार असून, या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहे. यामुळे विरोधकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
Shara Pawar- Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येतायेत. टिळक स्मारक ट्रस्टचा लोकमान्य टिळक पुरस्कार मोदींना प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यातल्या एसपी कॉलेजच्या मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. एकीकडे भाजपने राष्ट्रवादी फोडली असा आरोप होत असताना दुसरीकडे शरद पवारच मोदींसोबत स्टेज शेअर करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी फुटल्यानंतरही पवार मोदींच्या कार्यक्रमाला का जातायेत? (Sharad Pawar will share stage with pm narendra modi)
ADVERTISEMENT
1 ऑगस्टला टिळक पुरस्कार मोदींना प्रदान करण्यात येणार आहे. टिळक स्मारक ट्रस्टकडून हा पुरस्कार देण्यात येतो. या आधी इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, शरद पवार यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यंदाचा पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येतोय. आता या पुरस्काराला काँग्रेस, राष्ट्रवादीमधील पवारांचा गट, ठाकरे गट, आप आणि समविचारी पक्षांकडून विरोध होतोय.
टिळक पुरस्कार : शरद पवार चर्चेत का?
या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे हे खुद्द शरद पवार आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीवर 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. दुसरीकडे अजित पवारांनी बंड करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. असं असताना पवार मोदींसोबत स्टेज शेअर करत असल्याने अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
हे वाचलं का?
वाचा >> Sambhaji Bhide : महात्मा फुलेंना शिव्या, साईबाबांना म्हणाले ‘भड@#’, भिडे बरळले
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवारांनी भाजपची साथ दिली. भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवारांनी मोदींची स्तुती करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे २०२४ च्या निवडणुकांमध्ये भाजपला विरोध करण्यासाठी विरोधकांनी एकी केली आहे. या आघाडीला इंडिया असं नाव देखील देण्यात आलं आहे. शरद पवार हे या विरोधकांच्या आघाडीचे महत्त्वाचे सदस्य आहेत, असं असताना मोदींच्या कार्यक्रमाला पवार जात असल्याने इंडियाच्या नेत्यांकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ठाकरे गट नाराज
तिकडे ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. ‘जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेऊ नये’ असं म्हणत संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवर निषाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
वाचा >> Loksabha सर्व्हे: महाराष्ट्राने शिंदे-अजित पवारांना नाकारलं, NDA ला मिळणार फक्त…
तर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ‘मणिपूर जळत असताना पंतप्रधान त्यावर काही बोलत नाहीत. टिळकांना देखील पवारांनी अशा व्यक्तींना पुरस्कार देताना उपस्थित राहणं आवडलं नसतं. शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाण्याआधी विचार करावा’ असं सावंत म्हणाले आहेत. पवार गटातले स्थानिक नेते देखील पवारांनी या कार्यक्रमाला जाऊ नये या मताचे आहेत.
ADVERTISEMENT
शरद पवार या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार?
आता शरद पवार या कार्यक्रमाला जाण्यामागे एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे काही काळापूर्वी मोदींनी या कार्यक्रमाला यावं म्हणून शरद पवारांनी मध्यस्ती केली होती. टिळक ट्रस्टच्यावतीने पवारांनी मोदींना येण्याची विनंती केली होती. त्यामुळे पवार या पुरस्काराला जाणार असल्याचं बोललं जातंय.
वाचा >> Jaipur Mumbai Train Firing : जवानाने चौघांवर गोळ्या का झाडल्या? ते लोक कोण?
असं असताना मधल्या काळात मोदींनी जाहीर भाषणात भ्रष्टाचाराचा मुद्दा काढत राष्ट्रवादीवर टीका केली होती. दुसरीकडे राष्ट्रवादी देखील भाजपने फोडली असा आरोप देखील करण्यात येतो. त्यामुळे असं असताना पवारांनी या कार्यक्रमाला जाणं योग्य नसल्याचं कार्यकर्त्यांचं आणि इंडियाच्या नेत्यांचं म्हणणं आहे.
शरद पवार काय करणार?
या कार्यक्रमाला जाऊन पवार मणिपूर आणि देशभरातील घडामोडींवरुन मोदींना लक्ष करण्याची देखील शक्यता आहे. मोदी संसदेत येत नाही तर त्यांना जाहीर कार्यक्रमात पवार सवाल करण्याची शक्यता आहे. मोदींना मिळणाऱ्या पुरस्कारात पवार काही बोलले तर सहाजिकच सर्व देशात त्याची चर्चा होणार, त्यामुळे का कार्यक्रमातील पवारांच्या भाषणातील प्रत्येक महत्त्वाची टिपणी मोठी बातमी देणारी असणार आहे. असं असलं तरी मध्यंतरी राज ठाकरेंनी पवारांना लक्ष करत अजित पवारांचं बंड हे पवारांच्या आशिर्वादाशिवाय होऊ शकत नाही असं ते म्हणाले होते. त्यामुळे पवार मोदींसोबत एकाच मंचावर येतात का आणि त्यांच्या भाषणात ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT