ठाकरे-पवार भेट : सिल्व्हर ओकच्या बंद दाराआड ‘बिघाडी’वर चर्चा की नवं राजकारण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray met NCP president Sharad Pawar at his Silver Oak residence
Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray met NCP president Sharad Pawar at his Silver Oak residence
social share
google news

मुंबई : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. ठाकरे स्वत: पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी पोहचले होते. एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत व्यक्त केलेली नाराजी, तसंच फडतूस-काडतूस वादावरुनही ठाकरे यांना सुनावलेले खडे बोल या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं बोललं गेलं. ठाकरे-पवार भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊतही उपस्थित होते. दरम्यान या भेटीनंतर ठाकरे आणि राऊत या दोन्ही नेत्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले. (Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray met NCP president Sharad Pawar at his Silver Oak residence)

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते शरद पवार?

दोन्ही पद तीन पक्ष एकत्र येवून त्या संख्येमधून तयार झाली होती. यामध्ये तिन्ही पक्षांचा सहभाग होता. अशावेळी असा राजीनाम्याचा निर्णय कोणी घेत असेल तर त्याबाबत इतर सहकारी पक्षांशी चर्चा करणं आवश्यक होतं. चर्चा न करता निर्णय घेतात, त्याचे दुष्परिणाम होतात. दुर्देवाने त्यावेळी ही चर्चा झाली नाही ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही.

हे वाचलं का?

वैयक्तिक टिका-टिपण्णी करु नका :

दरम्यान, शरद पवार यांनी या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांना आणखी फडतूस आणि काडतूस या विधानवरुनही सुनावलं. पवार म्हणाले, मला जो महाराष्ट्र माहित आहे, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्रातील लोकांची मानसिकता माहित आहे, त्यात अशा गोष्टी शक्यतो टाळाव्यात. वैयक्तिक टिका-टिपण्णी नको. तुम्ही राजकीय मुद्दे घ्या, तुम्ही लोकांचे मुद्दे घ्या. त्यावर चर्चा करा. पण वैयक्तिक हल्ले होता कामा नयेत. अशा गोष्टी टाळायला हव्यात.

इतरही मुद्द्यांवर चर्चा झाली असण्याची शक्यता :

मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, उद्योगपती गौतम अदाणी यांच्या जेपीसी चौकशीची मागणी यावरुन पवार यांनी घेतलेली वेगळी भूमिका यामुळे महाविकास आघाडीत मतभेद सुरु असल्याची चर्चा आहे. मोदींच्या डिग्री विषयी चर्चा करण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादीने म्हटलं होतं. तर संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींची डिग्री खरी असली पाहिजे, असं मत शिवसेना (UBT)गटाकडून व्यक्त करण्यात आलं होतं. अशातच पवार-ठाकरे भेट झाली असल्याने या भेटीत या राजकीय विषयांवरही चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT