Court: ठाकरेंच्या बैठकीचं पत्र सरन्यायाधीशांनी मराठीतून का वाचून दाखवलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

A letter from Thackeray’s meeting was read by the Chief Justice himself in Marathi: नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर मागील दोन दिवसांपासून सलग सुनावणी आहे. या सुनावणीत वेगवेगळ्या मुद्द्यांवरून युक्तिवाद सुरू आहे. अशाच वेळी शिवसेनेने (Shiv Sena) 2019 साली पारित केलेल्या ठरावाबाबतचा एक मुद्दा समोर आला. पण खरं तर हे पत्र मराठीत होतं. त्यामुळे या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे हे खंडपीठातील सर्वच न्यायमूर्तींना कळलं. पण यावर स्वत: सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI Dhananjaya Chandrachud) यांनी मार्ग काढत स्वत:च शिवसेनेचं ते पत्र अस्खलित मराठीतून (Marathi) वाचून त्याचा नेमका अर्थ कोर्टाला समजावून सांगितला. (supreme court why did the chief justice read letter of resolution passed in thackerays meeting in marathi)

ADVERTISEMENT

कोर्टात नेमकं काय घडलं.. सरन्यायाधीशांनी का वाचलं मराठीतून पत्र?

शिवसेनेच्या ठरावाविषयीचा एक मुद्दा कोर्टात उपस्थित झाल्यानंतर त्याबाबतच्या पत्राचा मुद्दा समोर आला. तेव्हा पाच न्यायामूर्तींपैकी एक असलेल्या हिमा कोहलींनी सिब्बल यांना विचारलं की, या पत्राचं इंग्रजी भाषांतर केलेलं पत्र आहे का तुमच्याकडे आहे का? तेव्हा सिब्बल म्हणाले की.. आता आमच्याकडे नाही.. पण आम्ही ते तुम्हाला देऊ. पण त्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्वत:च ते मराठी पत्र अस्खलित मराठीत वाचून दाखवलं.

Shiv Sena Symbol : शिंदेंनी कारवाईची तलवार केली म्यान, ठाकरेंच्या आमदारांना मोठा दिलासा

हे वाचलं का?

सरन्यायाधीशांनी वाचून दाखवलेलं ते पत्र जसंच्या तसं…

‘गुरुवार, दिनांक 31 ऑक्टोबर 2019 रोजी शिवसेना भवन दादर, मुंबई येथे शिवसेना पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक शिवसेनाप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2019 मध्ये निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांनी बैठकीच्या सुरुवातीलाच या बैठकीत होणाऱ्या निर्णयांचे सर्वस्वी अधिकार अध्यक्ष म्हणून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले. याप्रमाणे बैठकीत महाराष्ट्र राज्य विधिमंडळातील शिवसेना पक्षाच्या गटनेता म्हणून आमदार एकनाथ संभाजी शिंदे व विधानसभेतील मुख्य प्रतोद म्हणून आमदार म्हणून सुनील प्रभू यांची एकमताने निवड करण्यात आली. या दोन्ही निवडींचे दोन ठराव पुढीलप्रमाणे आहेत.’

ठराव क्रमांक 1

‘शिवसेना पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या या बैठकीत ठराव करण्यात येत आहे की, शिवसेना विधीमंडळ गटनेते पदी आमदार एकनाथ संभाजी शिंदे यांची निवड करण्यात येत आहे.’

ADVERTISEMENT

Shiv Sena: सुप्रीम कोर्टाने शिंदेंचे बांधले हात! ठाकरेंच्या आमदारांना संरक्षण

ADVERTISEMENT

असं पत्र वाचत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी कोर्टाला या पत्राचा नेमका अर्थ काय हे इंग्रजीत समजावून सांगितलं. यावेळी चंद्रचूड यांनी अस्खलितपणे मराठीतून हे पत्र वाचून दाखवल्याने अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT