Uddhav Thackeray : “खोकेवाल्यांना उठता-बसता उद्धव ठाकरे दिसतो कारण…”
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत करताना एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागली.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकेची तोफ डागली. जे खोक्यात बंड झालं, त्यांना परत खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही, असे म्हणत ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावला. (Uddhav Thackeray Slams Eknath shinde)
ADVERTISEMENT
बीड जिल्ह्यातील गजानन कदम, उल्हासनगर येथील राजेश वानखेडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत आज पक्षात प्रवेश केला. त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार किरण माने ह्यांनी आज शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थितांशी संवाद साधला.
बंडखोरांवर ठाकरेंचे टीकेचे बाण
उद्धव ठाकरे म्हणाले, “काही जण आता भटकंती बाहेर गेले आहेत. त्यांना आता पुन्हा त्यांना घरात घेणार नाही. कारण जे खोक्यात बंड झालं आहे, त्यांना परत खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही. राजेशजी मी तुमचं स्वागत करतो. सुरुवातीला शिवसैनिक होतो आणि परत शिवसेनेत आलात. म्हणजे तुम्हाला माहितीये की, शिवसेनेसारखं प्रेम दुसऱ्या पक्षात मिळत नाही. म्हणून तुम्ही बोललात की, परत घरात आल्यासारखं वाटतं.”
हे वाचलं का?
पदाधिकाऱ्यांशी बोलताना ठाकरे म्हणाले, “लढाई फार मोठी आहे, पण तुमच्यासारखे कट्टर एकवटले तर लढाई फार सोपी आहे. कारण माणूस जिद्दीने उभा राहिला, तर त्याच्यासमोर पहाडासारखे संकटे आली तरी तो डगमगत नाही. न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. म्हणून आजसुद्धा आपल्यासमोर जे उभे आहेत, खोकेवाले, खोके घेणारे त्यांना उठता-बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो.”
उल्हासनगर येथील राजेश वानखेडे ह्यांनी आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला. ह्यावेळी त्यांचे सहकारी उपस्थित होते. pic.twitter.com/jvRlXHvm9M
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 7, 2024
ADVERTISEMENT
बीड जिल्ह्यातील गजानन कदम ह्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत आज पक्षात प्रवेश केला. ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. pic.twitter.com/LCeeOGRnNI
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 7, 2024
ADVERTISEMENT
मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार किरण माने ह्यांनी आज शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला. ‘एक उत्तम नेतृत्व पक्षाला मिळतंय ह्याचा आनंद आहे‘, असे उद्गार काढून पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. pic.twitter.com/m5thmcoPwj
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 7, 2024
“उद्धव ठाकरेंसोबत महाराष्ट्र”
“उद्धव ठाकरे एकटा नाहीये, उद्धव ठाकरेसोबत महाराष्ट्र आहे. 22 जानेवारीला काळाराम मंदिरात जातोय. तिकडे या. एक राम मंदिर अयोध्येत उभं राहतंय. आपल्याला अभिमान आहे. आनंद आहे. याचसाठी केला होता अट्टहास. कितीतरी कारसेवकांनी रक्त सांडलं. शिवसेनाप्रमुखांनीही भोगलं, सोसलं. बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. जे एक स्वप्न होतं, ते कोर्टाच्या आदेशाने पूर्ण होतंय. कोर्टाला सुद्धा 25-30 वर्षे लागली. त्याचवेळेला तो आपण काळाराम मंदिरात जातोय”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“नाशिकच्या काळाराम मंदिराचं एक वैशिष्ट्ये आहे. राम हा सर्वांचा आहे. राम माझा आहे, आपल्या सगळ्यांचा आहे आणि म्हणून मला सुद्धा त्या मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्यग्रह केला होता. त्यामुळे काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आणि गोदातीरी आरती सुद्धा करणार आहोत. दुसऱ्या दिवशी आपली सभा होईल, तिथे मी बोलेन. 13 तारखेला कल्याण लोकसभा मतदारसंघात जाणार आहे. असंख्य कार्यकर्त्यांना भेटणार आहे. त्याचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. विधानसभेप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघातील शाखांना मी भेटी देणार आहे”, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT