महाराष्ट्र भूषण : 14 श्री सदस्यांचे मृत्यू चेंगराचेंगरीमुळे? Video ने शिंदेंच्या वाढवल्या अडचणी
महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरुन सुरु झालेला वाद अद्याप कायम आहे. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान, मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांची संख्या आता 14 पर्यंत पोहचली आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Bhushan award controversy :
ADVERTISEMENT
मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरुन सुरु झालेला वाद अद्याप कायम आहे. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान, मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांची संख्या आता 14 पर्यंत पोहचली आहे. 14 जणांचा मृत्यूचं कारण उष्माघात सांगण्यात आलं आहे. मात्र हे मृत्यू उष्माघाताने नाही तर चेंगरुन झाले असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावरुन व्हायरल होऊ लागला असून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही केली आहे. (viral video added to the problems of the Shinde government in the Maharashtra Bhushan award controversy)
नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा व्हायरल व्हिडीओ ट्विट केला आहे. यावर ते म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमुळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय? या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो.
हे वाचलं का?
महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमूळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय?
या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो. pic.twitter.com/KP1jxrKVFW— Nana Patole (@NANA_PATOLE) April 19, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ट्विट करतांना आव्हाडांनी प्रश्नही उपस्थित केला आहे. “समाज माध्यमांमधून हा व्हिडीओ आला आहे. हा मोर्फ नाही कारण महाराष्ट्र शासनाची गाडी दिसते. हा चेंगराचेंगरीचा प्रकार कुठे घडला असावा?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
समाज माध्यमां मधून हा वीडियो आला आहे हा मोर्फ नाही कारण महाराष्ट्र शासनाची गाडी दिसते हा चेंगराचेंग्रीचा प्रकार कुठे घडला असावा ? pic.twitter.com/J6QMWKKDeP
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 18, 2023
ADVERTISEMENT
शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनीही हा व्हिडीओ ट्विट करत शिंदे सरकारवर आरोप केले आहेत. राऊत म्हणाले, “खारघर… सरकारी अव्यवस्था आणि राजकीय मनमानी चे निर्घृण बळी.. श्री सेवक चेंगरून मरण पावले. सरकारने मृतांचा खरा आकडा आजही लपवला आहे? मृतांचा आकडा आता 15 झालाय. देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागा.. आणखी किती पापं लपविणार आहात?”
खारघर…
सरकारी अव्यवस्था आणि राजकीय मनमानी चे निर्घृण बळी..
श्री सेवक चेंगरून मरण पावले.
सरकारने मृतांचा खरा आकडा आजही लपवला आहे?
मृतांचा आकडा आता 15 झालाय.
देवेंद्र फडणवीस जी
मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागा..
आणखी किती पापं लपविणार आहात?
@Dev_Fadnavi@AmitShah@AjitPawarSpeaks pic.twitter.com/9P8k3yEhMn— Sanjay Raut (@rautsanjay61) April 19, 2023
अजित पवारांनी उपचार घेणाऱ्या श्री सदस्यांनी काय सांगितलेलं?
14 जणांच्या मृत्यूचे कारण प्रशासनाने उष्माघात सांगितलं आहे. मात्र, कार्यक्रमाच्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली होती, असं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या भेटीनंतर सांगितलं होतं. अजित पवार म्हणाले होते की, “ज्यावेळी आम्ही इथे (एमजीएम रुग्णालय) पुरूष आणि महिलांना बोललो, तेव्हा बहुतेक जण पालघर, ठाणे, मुंबई शहर, पुणे जिल्ह्यातील लोणावळा वगैरे भागातील दिसले.
या रुग्णांनी सांगितलं की, आमच्या पोटात काही नव्हतं. काहींनी सांगितलं की, आम्ही फक्त फळं खाल्ली होती. पाण्याची व्यवस्था होती, पण उन्हाची तीव्र अतिशय होती. कार्यक्रम संपल्यानंतर गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली, असं काहींनी सांगितलं. काहींना नंतर काय झालं माहिती नाही, दवाखान्यात आल्यानंतर त्यांना कळलं की आपल्याला दवाखान्यात आणलं आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी रुग्णांच्या भेटीनंतर दिली होती.
Maharashtra Bhushan : मृत्यू झालेल्या श्री सदस्यांची नावे
1) तुळशिराम भाऊ वागड
2) जयश्री जगन्नाथ पाटील
3) महेश नारायण गायकर
4) कलावती सिद्धराम वायचाळ
5) मंजूषा कृष्णा भोंबडे
6) भीमा कृष्णा साळवी
7) सविता संजय पवार
8) स्वप्नील सदाशिव केणी
9) पुष्पा मदन गायकर
10) वंदना जगन्नाथ पाटील
11) मिनाक्षी मोहन मेस्त्री
12) गुलाब बबन पाटील
13) विनायक हळदणकर
14) स्वाती राहुल वैद्य
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT