Aditya Thackeray : "शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारं सरकार लवकरच कोसळणार"

वाचा नेमकं काय म्हटलं आहे आदित्य ठाकरे यांनी?
The government which stabs the farmers in the back will collapse soon Says Aditya Thackeray
The government which stabs the farmers in the back will collapse soon Says Aditya Thackeray

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालंय . नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत सरकारकडून मिळालेली नाही . राज्यभरातील या शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे धीर देत आहेत.शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं असल्याचं आश्वस्त करत आहेत . आदित्य ठाकरे यांच्या 'शेतकरी संवाद' यात्रेची आज अकोल्यातून सुरुवात झाली आहे . अकोला, बुलढाणा आणि संभाजी नगर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत .

राज्यातील जनतेला, शेतकऱ्यांना उघड्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध करत , आदित्य ठाकरे यांनी ४० आमदारांना आव्हान दिलंय . सरकार म्हणून ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाकी करा . तसंच तुम्हाला जनतेने गद्दार म्हणून नाही , राज्यकर्ते म्हणून स्वीकारलं असेल, तर तुम्हाला चेलेंज देतो,, मी राजीनामा देतो,, तुम्ही ४० जण राजीनामा देऊन निवडणुका घ्या,, बघुयात जनतेचा कौल काय आहे . हे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी सरकारमधील फुटीर आमदारांना दिलंय .

अकोल्यात झालेल्या संवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी जनतेचे आभार मानत . शिवसेनेचे अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांचा सन्मान केला . यावेळी बोलताना "एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते, आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या बांधावर जात असलो, तरी आज ही सभा नितीनजींसाठी आहे,, आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून ते लढतायत . ज्यांनी स्वतःला विकल नाही, मान सन्मान विकलं नाही, अश्या व्यक्तीला मिठी मारायला आलोय , हे प्रेम आणि हा विश्वास असतो" असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी नितीन देशमुख यांना मिठी मारत त्यांचं अभिनंदन केलंय . तसंच योगा योगाने डावीकडे आणि उजवीकडे निष्ठावान शिवसैनिक आहेत, आदर्श शिवसैनिक आहेत असं म्हणत २०१९ मध्ये महाविकास आघाडी बनत असताना , भाजप सोबत युती मोडत असताना, उद्धव साहेबांचा फोन यायच्या आधी प्रधानमंत्री कार्यालयात पदाचा राजीनामा देऊन मुंबईकडे यायला निघालेल्या अरविंद सावंत यांच् देखील आदित्य ठाकरे यांनी कौतुक केलंय .

अकोल्यातील संवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी बोलताना "आम्ही नजरेत नजर घालून सांगू शकतो,, आमच्या मनात मान, सन्मान, प्रेम निष्ठा आहे, दुसऱ्या बाजूला ४० गद्दार लोक, पळून गेले आहेत , तुम्ही कोणाच्या सोबत आहात ? असा सवाल उपस्थित जनतेला करत रणरणत्या उनात तुमचं प्रेम खरं नसत तर आला नसता, पण तुम्ही प्रेम द्यायला आलाय म्हणत आदित्य ठाकरेंनी त्यांचे आभार मानलेत .

यावेळी राज्यातून बाहेर जाणाऱ्या उद्योगांवर देखील आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलंय . "महाराष्ट्रात एवढं विचित्र वातावरण आहे, उद्योग राज्यातून पळून जातायत, शेतकऱ्यांचं कोणी ऐकत नाही , वर खरं मुख्यमंत्री कोण आपल्याला माहिती नाही , गदारांचा शिक्का माथ्यावर घेऊन फिरतायत" असं म्हणत सरकारवर घणाघात केलाय

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in