इंग्लंडविरुद्ध चेन्नई टेस्ट मॅच वाचवण्यासाठी टीम इंडियाला अखेरच्या दिवसात मोठा संघर्ष करावा लागणार आहे. इंग्लंडला दुसऱ्या डावात १७८ रन्सवर गुंडाळल्यानंतर भारताला विजयासाठी ४२० रन्सचं टार्गेट मिळालं. चेपॉकची खेळपट्टी शेवटच्या दिवसांमध्ये स्पिनर्सना मदत करत होती. अशा परिस्थितीतही रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने चांगली सुरुवात केली. परंतू जॅक लिचने रोहित शर्माला क्लिन बोल्ड करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर दिवसाअखेरीस टीम इंडियाने एक विकेट गमावत ३९ रन्सपर्यंत मजल मारली.
अखेरच्या दिवसात भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी ३८१ रन्सची गरज आहे. शेवटच्या दिवशी इंग्लंडचा जॅक लिच आणि डोम बेस या दोन स्पिनर्सच्या जोरावर भारताला झटपट गुंडाळण्याचा प्रयत्न करेल अशा परिस्थितीत शेवटचा दिवस भारतीय बॅट्समनना खूप सांभाळून खेळून काढावा लागणार आहे.
दरम्यान टीम इंडियाचा पहिला डाव ३३७ रन्सवर संपवल्यानंतर इंग्लंडने भारताला फॉलोऑन न देता बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडचे बॅट्समन झटपट रन्स करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरले होते. रविचंद्रन आश्विनने ६ विकेट्स घेत दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडला झटपट गुंडाळलं. पण अखेरच्या दिवशी स्पिनर्सला मदत करणाऱ्या पिचवर जॅक लिच आणि डोम बेस यासारख्या खेळाडूंचा सामना करताना टीम इंडियाच्या प्लेअर्सचा कस लागणार आहे.