महिला क्रिकेट टीमचा ऐतिहासिक विजय; 36 धावांवर टीम केली ऑलआउट, 6 ओव्हरमध्ये संपवला सामना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय महिला क्रिकेट टीमने आशिया कपमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महिला आशिया कपमध्ये टीम इंडियाची दमदार कामगिरी कायम आहे. सोमवारी थायलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने कमालच केली. टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करताना थायलंडचा डाव अवघ्या 37 धावांत आटोपला आणि नंतर 6 षटकांत लक्ष गाठून सामना जिंकला.

36 धावांवर थायलंडचा संपूर्ण संघ तंबूत

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जो ऐतिहासिक ठरला. टीम इंडियाला तिसर्‍याच षटकात पहिले यश मिळाले आणि त्यानंतर थायलंडची विकेट पडण्याची प्रक्रिया सुरू झाली. थायलंडकडून केवळ सलामीवीर नानापत कोन्चारोकाई दुहेरी आकडा गाठू शकली, ती वगळता सर्व फलंदाज 10 पेक्षा कमी धावा करू शकले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भारताकडून या सामन्यात स्नेह राणाने 3, राजेश्वरी गायकवाडने 2, दीप्ती शर्माने 2 आणि मेघना सिंगने 1 बळी घेतला.

थायलंडचे विकेट

ADVERTISEMENT

• 1-13, 2.5 षटके

ADVERTISEMENT

• 2-20, 6.5 षटके

• 3-20, 6.6 षटके

• 4-21, 7.4 षटके

• 5-24, 8.5 षटके

• 6-24, 9.4 षटके

• 7-27, 10.6 षटके

• 8-28, 11.5 षटके

• 9-37, 14.5 षटके

• 10-37, 15.1 षटके

भारताच्या फलंदाजांनी 6 षटकात सामना जिंकला

केवळ 38 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने 6 षटकांतच विजय मिळवला. यादरम्यान भारताची एक विकेटही पडली. मेघना आणि शेफाली वर्मा यांनी टीम इंडियासाठी सलामीला उतरले. मेघनाने 18 चेंडूत 20 धावा केल्या आणि नाबाद राहिली. शेफाली वर्मा अवघ्या 8 धावा करून बाद झाली, तर पूजा वस्त्राकरने नाबाद 12 धावा केल्या.

पॉईंट टेबलवर भारत नंबर एकवर

टीम इंडियाने आशिया कप-2022 च्या सेमीफायनलमध्ये आपले स्थान आधीच पक्के केले आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 जिंकून ते पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारत पाकिस्तानविरुद्ध फक्त एकच सामना हरला. पॉइंट टेबलमध्येही पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर असून त्याने सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT