Mumbai Tak /बातम्या / मॅचदरम्यान क्रिकेटरला हृदयविकाराचा झटका, मैदानावर 45 दिवसांत 8वा मृत्यू
बातम्या स्पोर्ट्स

मॅचदरम्यान क्रिकेटरला हृदयविकाराचा झटका, मैदानावर 45 दिवसांत 8वा मृत्यू

Man got heart attack during Cricket Match: राजकोट: गुजरातमधील राजकोट येथील क्रिकेट मैदानावर एका 45 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तो मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. त्याचवेळी अचानक त्याला चक्कर आली तो जमिनीवर कोसळला. त्यावेळी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याला आपला जीव गमवावा लागला होता. गुजरातमधील क्रिकेट मैदानावर गेल्या दीड महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने झालेला हा आठवा मृत्यू आहे. (man got heart attack during match 8th death in 45 days at cricket ground)

जमिनीवर कोसळला क्रिकेटर

45 वर्षीय मयूर हे राजकोटच्या रेसकोर्सवरील शास्त्री मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. पण क्रिकेट खेळता-खेळता अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे ते जमिनीवर बसले आणि बसता क्षणीच ते खाली कोसळले. त्यामुळे मैदानातही घबराटीचे वातावरण निर्माण झालं. लगेच त्यांच्या सहकाऱ्यांनी अॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. याचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर

त्याच्या साथीदारांनी सांगितले की, मयूर हा सोनार होता आणि त्याच्या घरात तोच एकमेव कमावणारा होता. मयूरच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, तो कधीही कोणत्याही अंमली पदार्थाचं सेवन देखील करायचा नाही. त्यामुळेच अचानक घडलेल्या या वेदनादायक घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. तर त्यांच्या कुटुंबावर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसात क्रिकेटच्या मैदानात हार्ट अॅटक येऊन मृत्यू होण्याच्या प्रकरणांमध्ये बरीच वाढ झाली आहे. यातही चिंतेची बाब म्हणजे अनेक तरूण मुलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहे. ज्यामुळे आता तरूण पीढिला त्यांच्या आरोग्याविषयी अधिकच जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. तसंच आपल्या आरोग्याला घातक असणारे खाद्यपदार्थ खाणं टाळलं पाहिजे.

क्रिकेट खेळतानाच तो मैदानावर कोसळला…योग करतानाच योगा प्रशिक्षकाचा मृत्यू, अवघ्या काही सेकंदात मृत्यूने गाठलं!

जीएसटी कर्मचाऱ्याला आला हृदयविकाराचा झटका

याआधी गुजरातमधील अहमदाबादमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान एका जीएसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. जीएसटी कर्मचारी आणि जिल्हा पंचायतीचे कर्मचारी यांच्यात हा सामना सुरू होता. गोलंदाजी करताना जीएसटी कर्मचाऱ्याची प्रकृती खालावली आणि तो जमिनीवर कोसळला.

गेल्या काही महिन्यांत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. भयावह बाब म्हणजे या प्रकरणांमध्ये बहुतांश तरुणांचा सहभाग आहे. 25 फेब्रुवारी रोजी तेलंगणातील नांदेडमध्ये एका तरुणाचा नाचताना मृत्यू झाला होता. त्यांचे वय अवघे 19 ​​वर्ष होते. यापूर्वी 22 फेब्रुवारी रोजी हैदराबादमधील जिममध्ये व्यायाम करताना एका पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

Gujrat : सहकाऱ्यांनी पाणी दिलं अन् नंतर… क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू

---------
‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान