Sandeep Lamichhane : प्रसिद्ध क्रिकेटर बलात्कार प्रकरणात दोषी, ‘इतक्या’ वर्षाची होणार शिक्षा
संदीप लामिछानेला अटक वॉरंट जारी होताच नेपाळ क्रिकेट असोसिएशनने (CAN) देखील संदीपला निलंबित केले होते. मात्र जानेवारी 2023 मध्ये संदीप लामिछाने यांना मोठा दिलासा मिळाला आणि त्यांची जामिनावर सुटका झाली होती.
ADVERTISEMENT

Kathmandu Court Convict Sandeep Lamichhane : जगभरात असे अनेक खेळाडू आहेत, जे प्रसिद्ध झोतात आल्यानंतर वादात सापडले आहेत. मग ते फिक्सिंग प्रकरण असो किंवा बलात्कार. आता असाच एक नेपाळचा प्रसिद्ध क्रिकेटर संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) बलात्कार प्रकरणात अडचणीत सापडला आहे. काठमांडू न्यायालयाने (Kathmandu Court) त्याला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. आता पुढील सुनावणीत त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या घटनेने क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली आहे. (sandeep lamichhane nepali cricketer minor girl rape case kathmandu court convicts)
23 वर्षीय संदीप लामिछाने हा नेपाळ क्रिकेटचा एक मोठा चेहरा आहे. त्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्येही भाग घेतला होता. आता याच संदीपला काठमांडू न्यायालयाने बलात्काराच्या एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात संदीप लामिछानेला 10 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. ‘आम्हाला या निर्णयाची अपेक्षा नव्हती, आम्ही निराश झालो आहोत. आम्ही नक्कीच वरच्या कोर्टात अपील करू, असे संदीपच्या वकिलाने सांगितले आहे. आता त्याच्यावरील शिक्षेची पुढील सुनावणीत 10 जानेवारीला होणार आहे. या सुनावणीत त्याला शिक्षा होते की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा : NCP : “जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता”, शिंदेंच्या नेत्याचं स्फोटक दावा
प्रकरण काय?
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एका 17 वर्षीय मुलीने संदीप लामिछानेविरोधात काठमांडू येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीन पीडित मुलीने लामिछानेविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. संदिप लामिछाने विरोधात ज्यावेळेस हे आरोप झाले होते, त्यावेळेस तो वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग खेळत होता. तो जमैका तल्लावाह संघाचा भाग होता. यावेळी त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी होताच संदीपला तात्काळ देशात परतण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र वॉरंट बजावताच संदीप लामिछाने फरार झाला होता. यावेळी नेपाळ पोलिसांनी संदीपला अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली होती. त्यानंतर इंटरपोलने संदीपविरोधात ‘डिफ्यूजन’ नोटीस जारी केली होती. त्यानंतर संदीप जेव्हा काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली.
संदीप लामिछानेला अटक वॉरंट जारी होताच नेपाळ क्रिकेट असोसिएशनने (CAN) देखील संदीपला निलंबित केले होते. मात्र जानेवारी 2023 मध्ये संदीप लामिछाने यांना मोठा दिलासा मिळाला आणि त्यांची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर संदीप लामिछाने पुन्हा आंतरराष्ट्रीय आणि फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये परतला होता.










