खेलरत्न पुरस्कारांची घोषणा! नीरज चोप्रा, रवि दहियासह 11 खेळाडूंचा होणार सन्मान
टोक्यो ऑलिम्पिक 2021 मध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णभेद करून भारतासाठी गोल्डन मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्राला यावर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. एवढंच नाही तर नीरजसह टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम खेळी करणाऱ्या खेळाडूंचीही नावं खेलरत्न पुरस्कारांच्या यादीत आहेत. पहिल्यांदाच 11 खेळाडूंचा सन्मान खेलरत्न पुरस्काराने केला जाणार आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा, क्रिकेटर मिताली राज, […]
ADVERTISEMENT
टोक्यो ऑलिम्पिक 2021 मध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णभेद करून भारतासाठी गोल्डन मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्राला यावर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. एवढंच नाही तर नीरजसह टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम खेळी करणाऱ्या खेळाडूंचीही नावं खेलरत्न पुरस्कारांच्या यादीत आहेत. पहिल्यांदाच 11 खेळाडूंचा सन्मान खेलरत्न पुरस्काराने केला जाणार आहे.
ADVERTISEMENT
भालाफेकपटू नीरज चोप्रा, क्रिकेटर मिताली राज, फुटबॉलपटू सुनील छेत्री, कुस्तीपटू रवि दहिया, बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन, हॉकीचा गोलकिपर पीआर श्रीजेश, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, सुमित अंति, अवनी लेखरा, कृष्णा नागर आणि मनीष नरवाल अशी या अकरा खेळाडूंची नावं आहेत.
ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेमुळे यंदा खेलरत्न पुरस्काराची घोषणा लांबणीवर पडली होती. गेल्या वर्षी पाच खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यावेळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंचा समावेश आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव मोठं करणाऱ्या चार पदक विजेत्यांचा यात समावेश आहे. तर टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या पाच खेळाडूंचा समावेश आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या निवडीसाठी गठीत केलेल्या समितीने 11 खेलरत्न पुरस्कारांसह 35 अर्जून पुरस्कारांची घोषणा केली आहे.
हे वाचलं का?
Neeraj, Ravi and Mithali to get Khel Ratna; Nair, Ouseph, highlight Dronacharya list
Read @ANI Story | https://t.co/YkDnpS77Y5#KhelRatna pic.twitter.com/mKztYYYPaW
— ANI Digital (@ani_digital) October 27, 2021
टोकियो ऑलिम्पिक 2020 ही भारतासाठी आजवरची सर्वाधिक यशस्वी ऑलिम्पिक स्पर्धा ठरली आहे. कारण या स्पर्धेत भारताने एका सुवर्णपदाकासह एकूण सात पदकांची कमाई केली आहे. याआधी लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने 6 पदकांची कमाई केली होती. पण यंदाची स्पर्धा खूपच विशेष ठरली आहे. कारण भारताने पहिल्यांदा ट्रॅक अॅण्ड फिल्ड प्रकारात नीरज चोप्रा याने भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT