2011 World Cup : टीम इंडियाच्या स्पेशल विजयाची खास झलक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आजच्या दिवशी १० वर्षांपूर्वी श्रीलंकेवर मात करुन विश्वचषक जिंकला होता. १९८३ नंतर विश्वचषक जिंकण्याची भारतीय संघाची ही दुसरी वेळ होती. आज या ऐतिहासीक विजयाला १० वर्ष पूर्ण झाली तरीही हा सामना आणि भारतीय खेळाडूंची कामगिरी प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करुन आहे. या निमीत्ताने आज आपण थोडक्यात या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातले काही क्षण अनुभवणार आहोत.

हे वाचलं का?

पहिल्या बॉलिंग करत असताना टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. झहीर खानने श्रीलंकेला सुरुवातीला धक्के देत बॅकफूटला ढकललं.

ADVERTISEMENT

यानंतर फॉर्मात असलेला तिलकरत्ने दिलशानही हरभजन सिंगच्या बॉलिंगवर क्लिन बोल्ड झाला.

ADVERTISEMENT

पण यानंतर महेला जयवर्धनेने कर्णधार कुमार संगकाराच्या साथीने महत्वाची भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला. जयवर्धनेने मधल्या ओव्हर्समध्ये भारतीय बॉलर्सचा सामना करत शतक झळकावलं. त्याला कुमार संगकारानेही ४८ रन्स काढून चांगली साथ दिली. संगकारा आणि जयवर्धनेच्या या पार्टनरशीपच्या जोरावर श्रीलंकेने ६ विकेट गमावत २७४ रन्सपर्यंत मजल मारली.

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली. टीम इंडियाचा ओपनर विरेंद्र सेहवाग लसिथ मलिंगाच्या बॉलिंगवर एकही रन न काढता आऊट झाला.

यानंतर मलिंगाने सचिन तेंडुलकरलाही आऊट करत भारताला आणखी एक धक्का दिला. घरच्या मैदानावर खेळणारा सचिन फायनल मॅचमध्ये १८ रन्स काढून आऊट झाला. सचिन आऊट झाल्यानंतर वानखेडे मैदानावर उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती.

लसिथ मलिंगाच्या या अनपेक्षित माऱ्यामुळे टीम इंडिया सुरुवातीलाच बॅकफूटला ढकलली गेली.

परंतू यानंतर गौतम गंभीरने विराट कोहलीच्या सोबत भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. गौतम गंभीर २०११ च्या वर्ल्डकप विजयातला अनसंग हिरो म्हणून ओळखला जातो.

महत्वाचे बॅट्समन आऊट झाल्यानंतरही गौतमने एक एंड सांभाळून ठेवत चांगली बॅटींग केली. श्रीलंकेच्या बॉलिंग लाईनअपचा समाचार घेत गौतमने भारतीय संघाच्या आशा पल्लवीत ठेवल्या. ९७ रन्स काढून गौतम गंभीर आऊट झाला.

यावेळी धोनीने एक महत्वाचा निर्णय घेऊन स्वतःला बॅटींग लाईन अपमध्ये प्रमोशन दिलं. गौतम गंभीर आऊट झाल्यानंतर धोनीने युवराजच्या साथीने महत्वाची भागीदारी करत श्रीलंकेच्या हातात आलेला विजय हिसकावून घ्यायला सुरुवात केली.

ही जोडी फोडणं श्रीलंकेच्या बॉलर्सला शेवटपर्यंत जमलं नाही. नुवान कुलशेखराच्या बॉलिंगवर धोनीने एक भन्नाट सिक्स लगावत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

महेंद्रसिंह धोनीच्या या विजयानंतर भारतीय टीमने मैदानात एकच जल्लोष केला. युवराज आणि धोनीला मिठी मारत सर्व भारतीय प्लेअर्स मैदानातच नाचायला लागले.

सचिन तेंडुलकरचा हा शेवटचा विश्वचषक होता. भारतीय संघाच्या विजयात आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या त्याच्या योगदानाबद्दल भारतीय खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यावर बसवत संपूर्ण मैदानात फेरी मारत त्याचा सन्मान केला. धोनीने मारलेल्या सिक्सव्यतिरीक्त हा क्षणही कोट्यवधी भारतीयांच्या मनात कोरला गेला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT