Ind vs Aus: भारताचा लाजिरवाणा पराभव, रोहित शर्मा फलंदाजांवर संतापला

मुंबई तक

Ind Vs Aus One Day : विशाखापट्टणम येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (Team India) केवळ 117 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने केवळ 11 षटकांत हे लक्ष्य गाठले. या दणदणीत पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने ही खेळपट्टी 117 धावांची नव्हती असे विधान केले आहे. (After the biggest […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

Ind Vs Aus One Day : विशाखापट्टणम येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (Team India) केवळ 117 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने केवळ 11 षटकांत हे लक्ष्य गाठले. या दणदणीत पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने ही खेळपट्टी 117 धावांची नव्हती असे विधान केले आहे. (After the biggest defeat in history, Rohit Sharma lashed out at these players)

सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ‘हे निराशाजनक आहे, यात शंका नाही. आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळलो नाही, आम्ही फलंदाजीत पूर्णपणे अपयशी ठरलो. आम्हांला माहीत होतं की वाचवायला फारशा धावा नाहीत, पण ही खेळपट्टी मात्र 117 धावांची नव्हती.

Ind vs Aus : टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा टी20 स्टाईल विजय

रोहित शर्मा म्हणाला, ‘आम्हाला वारंवार अंतराने धक्के बसले, शुभमन पहिल्याच षटकात बाद झाला आणि त्यानंतर मी-विराटने 30-35 धावा झटपट जोडल्या. पण मी आऊट झाल्यावर आमच्या विकेट्स सातत्याने पडू लागल्या. यानेच आपल्याला बॅकफूटवर ढकलले, तरीही या परिस्थितीतून परत येणे कठीण आहे. तो आमचा दिवस नव्हता, असं रोहित म्हणाला.