बाबर आझमने मोडला कोहलीचा मोठा विक्रम; गावस्कर, मियांदाद, सौरव गांगुली यांनाही टाकले मागे
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azan) आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे भलेही चांगले संबंध असतील, पण हे सर्व मैदानाबाहेर आहे. मैदानात उतरताच बाबरचे लक्ष्य नेहमीच विराट कोहलीच्या रेकॉर्डवर असते. बाबर सातत्याने कोहलीच्या खराब फॉर्मचा फायदा घेत त्याचे विक्रम मोडीत काढत आहे. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. बाबरने […]
ADVERTISEMENT
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azan) आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे भलेही चांगले संबंध असतील, पण हे सर्व मैदानाबाहेर आहे. मैदानात उतरताच बाबरचे लक्ष्य नेहमीच विराट कोहलीच्या रेकॉर्डवर असते.
ADVERTISEMENT
बाबर सातत्याने कोहलीच्या खराब फॉर्मचा फायदा घेत त्याचे विक्रम मोडीत काढत आहे. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. बाबरने कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला आणि सर्वात जलद 10,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा तो आशियातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. बाबरने श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत ही कामगिरी केली.
चार डावांच्या फरकाने मोडला कोहलीचा विक्रम
हे वाचलं का?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-20) सर्वात कमी 228 डावांमध्ये 10,000 धावा करणारा बाबर हा आशियातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. या प्रकरणात त्याने कोहलीचा विक्रम मोडला. कोहलीने 232 डावात ही कामगिरी केली होती. यासोबतच बाबारने दिग्गज सुनील गावस्कर, सौरव गांगुली आणि जावेद मियांदाद यांनाही मागे टाकले आहे.
सर्वात जलद 10,000 धावा करणारे आशियातील टॉप-5 क्रिकेटपटू
ADVERTISEMENT
बाबर आझम : 228 डाव
ADVERTISEMENT
विराट कोहली : 232 डाव
सुनील गावस्कर : 243 डाव
जावेद मियांदाद : 248 डाव
सौरव गांगुली : 253 डाव
एकूण यादीत बाबरचा पाचव्या क्रमांकावर
एकंदर जागतिक क्रमवारीत 10,000 धावा करणारा बाबर हा पाचवा क्रिकेटपटू आहे. यामध्ये वेस्ट इंडिजचा माजी स्टार खेळाडू विवियन रिचर्ड्स अव्वल स्थानावर आहे. त्याने त्याच्या काळात 206 आंतरराष्ट्रीय डावात 10,000 धावा केल्या होत्या. त्याच्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला (217), वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा (220) यांचा क्रमांक लागतो.
सर्वात जलद 10,000 धावा करणारा जगातील टॉप-5 क्रिकेटपटू
व्हिव्हियन रिचर्ड्स : 206 डाव
हाशिम आमला : 217 डाव
ब्रायन लारा : 220 डाव
जो रूट : 222 डाव
बाबर आझम : 228 डाव
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT