बिल्डिंगच्या गेटला कारची ठोकर दिल्याप्रकरणी माजी क्रिकेटर विनोद कांबळीला अटक
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला त्याच्या इमारतीच्या गेटला कार ठोकल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. PTI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. विनोद कांबळीने त्याच्या बिल्डिंगच्या गेटवर कार ठोकली. त्यानंतर त्याचा इमारतीच्या वॉचमनसोबत वादही झाला हा वाद इतका टोकाला पोहचला की रहिवाशांनी विनोद कांबळीच्या विरोधात […]
ADVERTISEMENT
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला त्याच्या इमारतीच्या गेटला कार ठोकल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. PTI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. विनोद कांबळीने त्याच्या बिल्डिंगच्या गेटवर कार ठोकली. त्यानंतर त्याचा इमारतीच्या वॉचमनसोबत वादही झाला हा वाद इतका टोकाला पोहचला की रहिवाशांनी विनोद कांबळीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी विनोदला अटक केली होती. त्याच्यावर रॅश ड्रायव्हिंग, लोकांचा जीव धोक्यात घालणे, इमारतीला नुकसान पोहचवणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
विनोद कांबळी हा भारताकडून 17 कसोटी आणि 104 वनडे खेळला आहे. विनोद कांबळीचा जन्म मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे. त्याचे वडील मॅकेनिक होते. सचिन तेंडुलकर आणि त्याची जोडी होती. रमांकात आचरेकर हे त्याचेही गुरू होते. शिवाजी पार्कवर जाण्यासाठी कांजूरमार्ग येथून ट्रेनने दादरला जात असे.
हे वाचलं का?
याआधी विनोद कांबळी २०२१ मध्येही चर्चेत आला होता. केवायसी अपडेच करण्याच्या बहाण्याने त्याच्या बँक खात्यातून एक लाखापेक्षा जास्त रक्कम लंपास केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार विनोद कांबळी दारू पिऊन दारू चालवत होता. त्याच्याविरोधात एका व्यक्तीने तक्रारही केली होती. गाडीने टक्कर मारल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT