प्रशिक्षक म्हणून शास्त्री गुरुजींच्या जमेच्या बाजू माहिती आहेत का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आलं. यासोबत प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपला आहे.

हे वाचलं का?

राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा कोच म्हणून रुजू झाला आहे. त्याआधी आपण रवी शास्त्रींचा संघाच्या विजयातलं मोठं योगदान पाहूयात.

ADVERTISEMENT

प्रशिक्षक म्हणून पहिल्याच प्रयत्नात रवी शास्त्रींनी भारतीय संघाला श्रीलंकेत तिन्ही प्रकारांत ९-० असा दणदणीत विजय मिळवून दिला होता.

ADVERTISEMENT

दक्षिण आफ्रिकेत ५-१ च्या फरकाने वन-डे मालिका जिंकण्यात भारतीय संघाला रवी शास्त्रींची मोलाची मदत

जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा हे भारताचं जलदगती गोलंदाजीचं त्रिकुट रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली तयार झालं.

रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया सलग ५ वर्ष कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर होती.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला पोहचवण्यात रवी शास्त्रींनी मोलाची भूमिका बजावली होती.

२०१९ च्या आधी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकला नव्हता. परंतू शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने सलग दोन वर्ष ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली.

शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली १५ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये भारताने कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली होती. परंतू अखेरचा कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करावा लागला.

शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ ४६ कसोटी सामने खेळला ज्यापैकी २८ सामने भारताने जिंकले. कसोटीत शास्त्रींची कोच म्हणून विजयी टक्केवारी ही ६०.८७ टक्के, वन-डेमध्ये ६७ टक्के तर टी-२० मध्ये ६६ टक्के आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT