T-20 World Cup : ICC भारताऐवजी पर्यायी जागांचा विचार करणार
खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयला आयपीएल २०२१ ची स्पर्धा मधेच स्थगित करावी लागली. यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात प्रस्तावित टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. याचकाळात भारतात तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यामुळे आयसीसी आता टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनासाठी भारताला पर्याय काय असू शकतो याचा विचार करणार आहे. १ जूनला आयसीसीच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. […]
ADVERTISEMENT
खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयला आयपीएल २०२१ ची स्पर्धा मधेच स्थगित करावी लागली. यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात प्रस्तावित टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. याचकाळात भारतात तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यामुळे आयसीसी आता टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनासाठी भारताला पर्याय काय असू शकतो याचा विचार करणार आहे. १ जूनला आयसीसीच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.
ADVERTISEMENT
कोरोनाविरुद्ध लढाईत BCCI ही मैदानात, २ हजार Oxygen Concentrators करणार दान
या बैठकीत आयोजनाबद्दल अंतिम निर्णय होणं अपेक्षित नसलं तरीही सर्व सदस्य स्पर्धा भारतात खेळण्याबाबत आपली मतं मांडतील. जर ५-६ महिन्यांत भारतात कोरोनाची तिसरी लाट आली तर टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनासाठी काय पर्याय असू शकतात यावर या बैठकीत विचारविनीमय होणार आहे. दरम्यान बीसीसीआयही या मुद्द्यावर चर्चा करणार असून २९ मे ला होणाऱ्या बैठकीत टी-२० विश्वचषकाचं आयोजन आणि इतर आयपीएलच्या उर्वरित हंगामाबद्दल निर्णय घेतला जाण्याचे संकेत मिळत आहेत.
हे वाचलं का?
भारतात स्पर्धेचं आयोजन झालं नाही तर आयसीसीने युएई हा पर्याय म्हणून आधीच जाहीर केला आहे. परंतू युएईत स्पर्धा भरवायची असेल तर सर्व संघाची राहण्याची व्यवस्था, बायो बबल आणि इतर सर्व मुद्द्यांवर आयसीसीला विचार करावा लागणार आहे. त्यामुळे आगामी बैठकीत कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आयसीसी आणि बीसीसीआय टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाबद्दल काय तोडगा काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
BCCI ने प्लान आखला, IPL 2021 चे उर्वरित सामने युएईत?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT