Marlon Samuels: ICC ची मोठी कारवाई! क्रिकेटपटूवर घातली 6 वर्षांची बंदी, कारण…

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Why Marlon Samuels banned by ICC.
Why Marlon Samuels banned by ICC.
social share
google news

Marlon Samuels News : क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटून मार्लोन सॅम्युअल्सवर तब्बल 6 वर्षांची बंदी घातली आहे. सर्व प्रकारचे क्रिकेट खेळण्यावर ही बंदी घालण्यात आली असून, आयसीसी एचआर आणि इंटिग्रिटी युनिटचे प्रमुख अॅलेक्स मार्शल यांनी गुरुवारी सॅम्युअल्सवरील बंदीची घोषणा केली.

ADVERTISEMENT

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटून सॅम्युअल्सवर घालण्यात आलेल्या बंदीचे कारणही आयसीसीने स्पष्ट केले आहे. ही कारवाई क्रिकेटमधील भ्रष्टाचाराविरोधातील एक मोठे पाऊल असल्याचं आयसीसीने म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेटपटू सॅम्युअल्सला अमिराती क्रिकेट बोर्डाच्या (ECB) भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

हेही वाचा >> IPL Transfer Window 2024 : हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार? रोहित शर्मा बदलणार टीम!

आयसीसीचे एचआर अॅलेक्स मार्शल या प्रकरणाबद्दल म्हणाले, ‘सॅम्युअल्स जवळपास दोन दशके आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्यादरम्यान त्याने भ्रष्टाचारविरोधी अनेक सत्रांमध्ये भाग घेतला आणि भ्रष्टाचारविरोधी संहितेअंतर्गत त्यांची जबाबदारी काय आहे, हे त्याला माहीत होते. तो आता निवृत्त झाला असला, तरी जेव्हा हे गुन्हे घडले तेव्हा सॅम्युअल्स सहभागी होता. ही सहा वर्षांची बंदी, भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन करणाचा उद्देश असणाऱ्या कोणत्याही खेळाडूसाठी कठोर मेसेज म्हणून काम करेल.”

हे वाचलं का?

आयसीसीने 2021 मध्ये केले होते आरोप?

ICC ने सप्टेंबर 2021 मध्ये मार्लोन सॅम्युअल्सवर आरोप लावले होते. आयसीसीच्या आरोपानुसार सॅम्युअल्सने अमिराती क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेतील कलम 2.4.2, 2.4.3, 2.4.6 आणि 2.4.7 चे उल्लंघन केले आहे. ही कलमे भेटवस्तू, पेमेंट, आदरातिथ्य किंवा इतर फायदे घेतल्याची माहिती भ्रष्टाचारविरोधी अधिकार्‍यांना न देण्याच्या संदर्भात आहे. ही कलमे क्रिकेटची प्रतिमा मलिन होणार नाही, या अनुषंगाने आहे. यासोबतच तपासात सहकार्य न करणे, माहिती लपवून तपासात अडथळा आणणे किंवा विलंब करणे आदी कलमांचाही यात समावेश आहे.

हेही वाचा >> वर्ल्ड कपमधील पराभवानंतर गुडन्यूज! विराट-रोहितला वर्ल्ड कपमधील कामगिरीचं मिळालं फळ

सॅम्युअल्सन या वर्षी ऑगस्टमध्ये या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला होता. मार्लन सॅम्युअल्सने 2019 मध्ये अबू धाबी T10 लीग दरम्यान भ्रष्टाचारविरोधी नियम तोडल्याचा आरोप होता. T10 लीगचा चौथा सीझन अबू धाबीमध्ये 2019 मध्ये जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान खेळवला गेला होता. सॅम्युअल्स तेव्हा कर्नाटक टस्कर्स संघाकडून खेळत होता. त्या संघाचा कर्णधार हाशिम आमला होता.

ADVERTISEMENT

सॅम्युअल्सन कायम राहिला वादात?

42 वर्षीय मार्लन सॅम्युअल्सचा वादांशी नेहमीच संबंध राहिला आहे. 2008 मध्ये आयसीसीने त्याला पैसे घेणे आणि क्रिकेटची बदनामी केल्याप्रकरणात दोषी ठरवले होते आणि त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली होती. आयसीसीने 2015 मध्ये त्याची गोलंदाजी अ‍ॅक्शन बेकायदेशीर ठरवली होती आणि त्याच्यावर एक वर्षासाठी गोलंदाजी करण्यास बंदी घातली होती. 2014 मध्ये त्याने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डासोबतच्या पगाराच्या वादामुळे तत्कालीन कर्णधार ड्वेन ब्राव्होच्या भारत दौऱ्यातून माघार घेण्याच्या निर्णयालाही विरोध केला होता.

ADVERTISEMENT

वेस्ट इंडिजकडून सॅम्युअल्सने केलीये चमकदार कामगिरी

सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजसाठी 71 कसोटी, 207 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 67 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. त्याच्या नावावर 17 शतकांसह तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,134 धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 152 फलंदाजांना बाद केले आहे.

हेही वाचा >> IPL ऑक्शनआधीच मोठा करार! राजस्थानकडून 10 करोडमध्ये ‘हा’ खेळाडू खरेदी

या काळात त्याने एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्वही केले. सॅम्युअल्सने 2012 आणि 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दोन्ही T20 विश्वचषकांच्या अंतिम फेरीत सॅम्युअल्स ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT