Ind Vs Aus Test: सूर्या की अय्यर, रोहित शर्मा कुणाची निवड करणार?
Ind vs Aus 2nd test playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (17 फेब्रुवारी) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. नागपूर कसोटीत भारताने कांगारूंचा एक डाव आणि 132 धावांनी धुव्वा उडवला. दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाला (australia team) पुन्हा एकदा पराभवाचा धक्का देण्याचा रोहित ब्रिगेडचा प्रयत्न असेल. दुसरा कसोटी सामना भारतीय […]
ADVERTISEMENT
Ind vs Aus 2nd test playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (17 फेब्रुवारी) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. नागपूर कसोटीत भारताने कांगारूंचा एक डाव आणि 132 धावांनी धुव्वा उडवला. दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाला (australia team) पुन्हा एकदा पराभवाचा धक्का देण्याचा रोहित ब्रिगेडचा प्रयत्न असेल. दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. (ind vs aus 2nd test : Team india playing 11)
ADVERTISEMENT
दुसऱ्या कसोटीत श्रेयस अय्यरला संधी मिळेल का? कुणाचा संघात समावेश केला जाईल, प्लेइंग-11 मध्ये कोण असणार याकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष आहे. दिल्ली कसोटीच्या आधी श्रेयस अय्यरचे संघात पुनरागमन झाले आहे, त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याचा थेट प्लेइंग-11 मध्ये समावेश करते की नाही हे पाहावे लागेल. श्रेयस अय्यरला खेळवलं तर सूर्यकुमार यादवला बाहेर बसावं लागेल. नागपूर येथे झालेल्या सामन्यातूनच सूर्याने कसोटी पदार्पण केले. मात्र, सूर्याला काही विशेष कामगिरी करता आली नाही आणि तो लवकरच तंबूत परतला.
राहुलवर असेल चांगल्या खेळीचं दडपण
पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुल आणि केएस भरत यांना चांगली फलंदाजी करता आली नाही. 71 चेंडू खेळूनही राहुलला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दुसरीकडे नवोदित यष्टिरक्षक केएस भरतही केवळ 8 धावांच करू शकला. शुभमन गिल आणि ईशान किशन संधींच्या प्रतिक्षेत असल्यानं दोघांवरही चांगली कामगिरी करण्याचं दडपण असणार आहे. कारण शुभमन गिलला पहिल्या सामन्यातून वगळण्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. राहुल पुन्हा अपयशी ठरला तर तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळणार नाही.
हे वाचलं का?
Team India ठरली तिन्ही फॉरमॅटमध्ये टॉप; ‘या’ खेळाडूंनीही गाजवलं नावं
अरुण जेटली स्टेडियमवरील खेळपट्टीवर चेंडू स्विंग होताना दिसेल. त्यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजीची रणनीती करावी लागणार आहे. म्हणजेच अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे फिरकी त्रिकूट पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या नाकीनऊ आणताना दिसू शकतं.
यामुळे कुलदीप यादवला पुन्हा मैदानाबाहेर बसून सामना बघावा लागू शकतो. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी हे दोन वेगवान गोलंदाज खेळवले जातील.
ADVERTISEMENT
दिल्लीत भारताच्या विजयाचा इतिहास
1987 पासून भारताने दिल्लीत एकही कसोटी सामना गमावलेला नाही. दिल्लीत खेळवल्या गेलेल्या 34 पैकी 13 कसोटी सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे आणि फक्त सहा गमावले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ दिल्लीत एकूण 7 कसोटी सामने खेळला असून 1959 पासून तो विजयाच्या प्रतिक्षेत आहे.
ADVERTISEMENT
‘या’ महिला क्रिकेटरने रचला इतिहास, धोनीचा विक्रम मोडला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 2013 साली दिल्लीत खेळवला गेला होता. त्यादरम्यान एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला होता. आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 14 बळी घेत भारताच्या मोठ्या विजयाचा पाया रचला होता.
‘अबे मला काय दाखवतोय..’, कॅमेरामॅनवर भडकला Rohit Sharma
दुसऱ्या कसोटीसाठी अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग-11:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT