Ind vs Eng 1st Test : भारताला विजयाची उत्तम संधी, दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहचा भेदक मारा
इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहॅम येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयाची चांगली संधी आलेली आहे. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावांवर संपुष्टात आला. ज्यामुळे भारताला विजयासाठी २०९ धावांचं आव्हान मिळालं. बुमराहने दुसऱ्या डावात ५ बळी घेत इंग्लंडला फार मोठी आघाडी मिळणार नाही याची काळजी घेतली. चौथ्या दिवसाअखेरीस भारताने १ विकेट गमावत ५२ धावांपर्यंत […]
ADVERTISEMENT
इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहॅम येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयाची चांगली संधी आलेली आहे. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावांवर संपुष्टात आला. ज्यामुळे भारताला विजयासाठी २०९ धावांचं आव्हान मिळालं. बुमराहने दुसऱ्या डावात ५ बळी घेत इंग्लंडला फार मोठी आघाडी मिळणार नाही याची काळजी घेतली. चौथ्या दिवसाअखेरीस भारताने १ विकेट गमावत ५२ धावांपर्यंत मजल मारली आहे.
ADVERTISEMENT
चौथ्या दिवसाच्या खेळात मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या डावाला पहिला धक्का दिला. रोरी बर्न्सला त्याने पंतकरवी १८ रन्सवर आऊट केलं. यानंतर झॅक क्रॉलीही बुमराहच्या बॉलिंगवर आऊट झाला. कॅप्टन जो रुट आणि डोम सिबले यांनी तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला. परंतू बुमराह आणि सिराज यांनी भेदक मारा करत इंग्लंडला आणखी धक्के दिले.
सिबले, जॉनी बेअरस्टो, डॅन लॉरेन्स, जोस बटलर या इंग्लंडच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांना भारतीय बॉलर्सनी मैदानावर फार टिकण्याची संधीच दिली नाही. एकीकडे कॅप्टन जो रुटने एकट्याने किल्ला लढवत भारतीय बॉलर्सचा सामना केला. त्याने १७२ बॉलमध्ये १४ फोर लगावत १०९ रन्सची झुंजार इनिंग खेळली. बुमराहने त्याला आऊट केलं. यानंतर अखेरच्या फळीत सॅम करनने फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण त्याचे प्रयत्नही तोकडेच पडले. अखेरीस ३०३ धावांवर इंग्लंडचा दुसरा डाव संपवण्यात भारताला यश आलं.
हे वाचलं का?
Tokyo Olympics मध्ये पदकविजेत्या खेळाडूंचा BCCI करणार सत्कार, जय शहांची घोषणा
चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सेशनमध्ये काही ओव्हर्सचा खेळ बाकी असताना भारताला बॅटींगची संधी मिळाली. अखेरच्या सत्रात विकेट न जाऊ देण्याचं मोठं आव्हान भारतासमोर होतं. पहिल्या इनिंगमध्ये आश्वासक अर्धशतकी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलने काही सुरेख फटके लगावत चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा देखील एक बाजू लावून उभा होता. परंतू स्टुअर्ट ब्रॉडने लोकेश राहुलला आऊट करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर रोहित आणि पुजारा यांनी संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. दिवसाअखेरीस भारताने ५२ धावांपर्यंत मजल मारली असून अखेरच्या दिवशी सावध खेळ केल्यास भारताला विजयाची चांगली संधी आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT