Ind vs wi: टेस्ट डेब्यूत जयस्वालची ‘यशस्वी’ कामगिरी! क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरचा मोडला रेकॉर्ड

मुंबई तक

ADVERTISEMENT

ind vs wi yashasvi jaiswal debut record break sachin tendulkar team india west indies
ind vs wi yashasvi jaiswal debut record break sachin tendulkar team india west indies
social share
google news

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेला आजपासून सूरूवात झाली आहे. या टेस्ट सामन्यात टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल (yashasvi jaiswal) आणि विकेटकिपर ईशान किशनने (Ishan Kishan) डेब्यू केला आहे.या डेब्यू सामन्यातच आता यशस्वी जयस्वालने मोठी कामगिरी केली आहे. यशस्वीने ही कामगिरी करून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (sachin tendulkar) याचा विक्रम मोडीत काढला आहे. त्यामुळे यशस्वीच्या या डेब्यू सामन्यातील विक्रमाची आता चर्चा रंगली आहे. (ind vs wi yashasvi jaiswal debut record break sachin tendulkar team india west indies)

मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या यशस्वी जयस्वाल आयपीएल 2023 गाजवलं होता. त्याच्या आयपीएल स्फोटक खेळीने त्याने संपूर्ण क्रिकेट विश्वाच मन जिंकलं होते. राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळणाऱ्या यशस्वी जयस्वालने 14 सामन्यात 625 धावा ठोकल्या होत्या. या त्याच्या कामगिरीवरून त्याची भारतीय संघात निवड झाली होती. आता देशांतर्गत क्रिकेटच्या प्रथम श्रेणी सामन्यांत जयस्वालने आतापर्यंत 15 सामन्यांमध्ये 80.21 च्या सरासरीने 9 शतकांसह 1845 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

हे ही वाचा : BCCI: रोहित-विराटचं टी20 करिअर धोक्यात? आगरकरांच्या संघ निवडीवर प्रश्नचिन्ह

देशांतर्गत क्रिकेटमध्ये 80.21 च्या सरासरीसह टीम इंडियासाठी पदार्पण करणारा यशस्वी जयस्वाल तिसरा फलंदाज ठरला आहे. ही कामगिरी करून त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने ज्यावेळेस भारतासाठी टेस्ट डेब्यू केला होता. त्यावेळी देशांतर्गत क्रिकेटमध्ये 70.18 च्या सरासरी होती. तर टेस्ट डेब्यू करताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वांधिक सरासरी ही विनोद कांबलीची होती. कांबळीची देशांतर्गत क्रिकेटमध्ये 88.37 च्या सरासरी होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सर्वाधिक सरासरीने कसोटी पदार्पण करणारे खेळाडू

विनोद कांबळी (27 सामने) : 88.37 सरासरी
प्रवीण आमरे (23 सामने) : 81.23 सरासरी
यशस्वी जयस्वाल (15 सामने) : 80.21 सरासरी
रुसी मोदी (38 सामने) : 71.28 सरासरी
सचिन तेडूलकर (9 सामने) : 70.18 सरासरी
शुभमन गिल (23 सामने) : 68.78 सरासरी

टीम इंडियाची दमदार सुरुवात

वेस्ट इंडीज विरूद्धच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून वेस्ट इंडिजसा लंचपुर्वीच 68 धावावर 4 धक्के दिले आहे. टीम इंडियाने अशाच लयीत गोलंदाजी केल्यास वेस्ट इंडीज पहिल्याच दिवशी ऑल आऊट होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाकडून रविचंद्रन अश्विनने दोन विकेट काढली आहेत. तर शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट काढली आहे. आता टीम इंडिया वेस्ट इंडीजला किती धावात रोखते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाक सामना ‘या’ दिवशी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT