Ind vs Pak women world cup : पाकिस्तानचा १०७ धावांनी उडवला धुव्वा! भारताचा विजयी प्रारंभ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयसीसी महिला विश्व चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा अक्षरशः धुव्वा उडवला. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला धुळ चारत भारताने विश्वचषक मोहिमेची विजयाने सुरूवात केली. भारताकडून स्मृती मंधाना, पूजा वस्त्रेकर स्नेह राणा यांनी अर्धशतकं झळकावली, तर गोलंदाजीत राजेश्वरी गायकवाडने पाकिस्तानचा निम्मा संघ गारद केला. भारतीय संघाने चमकदार कामगिरीचं प्रदर्शन करत पाकिस्तानचा १०७ धावांनी पराभव केला.

ADVERTISEMENT

महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर २४५ धावांचं आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाची दमछाक झाली. भारताने पाकिस्तानचा अवघा संघ ४३ षटकं आणि १३७ धावांमध्येच गुंडाळला. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने गोलंदाजीत कमाल करत पाकिस्तानला धक्के दिले. त्यामुळे पाकिस्तानला शेवटपर्यंत डाव सावरता आला नाही. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर झूलन गोस्वामीने दोन गडी बाद केले.

प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरूवात चांगली झाली नाही. तिसऱ्याच षटकात भारताला पहिला झटका बसला. संघाची धावसंख्या ४ असताना सलामीवीर शेफाली वर्मा बाद झाली. त्यानंतर दीप्ती शर्मा आणि स्मृती मंधानाने डाव सावरला.

हे वाचलं का?

दीप्ती शर्मा आणि स्मृती मंधानाने ११६ चेंडूत ९२ धावांची भागीदारी केली. २२ षटकात भारताची धावसंख्या ९६ असताना दीप्ती शर्मा बाद झाली. ५७ चेंडूत ४० धावा केल्या. दीप्तीनंतर स्मृती मंधानाही तंबूत परतली. स्मृतीने ७५ चेंडूत ५२ धावा केल्या. स्मृतीनंतर मैदानात आलेल्या मिताली राजला मोठी खेळ करता आली नाही. ३६ चेंडूत ९ धावा करून मिताली बाद झाली.

त्यानंतर हरमनप्रीत कौर (१४ चेंडूत ५ धावा), रिचा घोष (५ चेंडूत १ धाव) बाद झाल्यानं भारताच्या मोठ्या धावसंख्येच्या आशा काही काळापुरत्या मावळल्या होत्या. मात्र, नंतर स्नेह राणा आणि पूजा वस्त्रेकर यांनी मैदानात जम बसवत धावांचा वेग वाढवला. स्नेह राणाने नाबाद ५३ धावा केल्या, तर पूजा वस्त्रेकर ६७ धावा केल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये दोघींनी केलेल्या धावांमुळे भारताला २४४ धावसंख्या गाठता आली.

ADVERTISEMENT

पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली

ADVERTISEMENT

२४५ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ सपशेल अपयशी ठरला. पाकिस्तानकडून सलामीवीर सिदरा अमीनने सर्वाधिक ३० धावा केल्या. तर शेवटी मैदानात उतरलेल्या डायना बेगने २४ धावा केल्या. सिदरा आणि डायना वगळता पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही आणि पाकिस्तानी संघ १३७ धावापर्यंतच मजल मारु शकला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT