IPL 2021 : खेळाडूंकडून मदतीचा ओघ वाढला, निकोलस पूरनची Corona विरुद्ध लढ्याला आर्थिक मदत
भारतात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहून आतापर्यंत ५ खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण पाहता सध्याच्या घडीला आयपीएलचे सामने खेळवणं गरजेचं आहे का असा प्रश्न आणि चर्चा गेल्या काही दिवसांपासून विचारला जात आहे. अशा परिस्थितीत काही खेळाडू मदतीसाठी पुढे येत आहेत. वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये पंजाबचं प्रतिनिधीत्व […]
ADVERTISEMENT
भारतात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहून आतापर्यंत ५ खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण पाहता सध्याच्या घडीला आयपीएलचे सामने खेळवणं गरजेचं आहे का असा प्रश्न आणि चर्चा गेल्या काही दिवसांपासून विचारला जात आहे. अशा परिस्थितीत काही खेळाडू मदतीसाठी पुढे येत आहेत. वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये पंजाबचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या निकोलस पूरनने आपल्या कमाईमधील काही हिस्सा आरोग्य व्यवस्थेला दान करायचं ठरवलं आहे.
ADVERTISEMENT
IPL 2021 : Bio Secure Bubble मध्ये आम्ही सुखरुप आहोत : क्विंटन डी-कॉक
निकोलस पूरनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका व्हिडीओ मेसेज पोस्ट करत या योगदानाबद्दल माहिती दिली आहे. “माझ्या सर्व फॅन्सना मी हे सांगू इच्छितो की मी भारतात सुखरुप आहे. परंतू सध्या आमच्याभोवतीचं वातावरण पाहून दुःख होत आहे. भारतात गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला प्रेम मिळालं, त्यामुळे हा देश संकटात असताना कोरोनाविरुद्ध लढाईत जागरुकता निर्माण करण्यासाठी मी माझ्या पद्दतीने थोडंस योगदान देत आहे. माझ्या आयपीएलमधील कमाईचा काही हिस्सा मी भारतामधील आरोग्य व्यवस्थेला दान करत आहे.”
हे वाचलं का?
Although many other countries are still being affected by the pandemic, the situation in India right now is particularly severe. I will do my part to bring awareness and financial assistance to this dire situation.#PrayForIndia pic.twitter.com/xAnXrwMVTu
— nicholas pooran #29 (@nicholas_47) April 30, 2021
निकोलस पूरनसोबतच राजस्थान रॉयल्सच्या जयदेव उनाडकटनेही आपल्या कमाईतला काही हिस्सा कोरोनाविरुद्ध लढाईला दान म्हणून देण्याचं ठरवलं आहे. याआधी कोरोनामुळे खेळाडू भारत सोडून जात असताना KKR च्या पॅट कमिन्सने ५० हजार डॉलर्सची मदत पंतप्रधान सहायता निधीला दिली. ज्यानंतर ब्रेट ली ने देखील या लढाईत आपलं आर्थिक योगदान दिलं. ज्यानंतर आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघानेही आपली जबाबदारी ओळखत सध्या आरोग्य व्यवस्थेवर येत असलेला ताण ओळखत आपला खारीचा वाटा उचलला आहे.
IPL 2021 : कोरोनाविरुद्ध लढ्यात राजस्थान रॉयल्सचं मोठं योगदान, ७.५ कोटींची आर्थिक मदत
ADVERTISEMENT
दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, संभ्रमाच्या वातावरणामुळे परदेशी खेळाडूंमध्ये निर्माण झालेली बेचैनी पाहता…बीसीसीआयने सीईओ हेमांग अमिन यांनी आठही संघमालकांना विशेष पत्र लिहीलं आहे. या पत्रात प्रत्येक खेळाडूला स्पर्धा संपल्यानंतर त्याच्या घरी सुखरुप पोहचवण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे. खेळाडूच नव्हे तर स्पर्धेसाठीचे कॉमेंट्रेटर्स, अंपायर्स व इतर कर्मचाऱ्यांनाही स्पर्धेनंतर सुखरुप घरी पोहचवण्याची व्यवस्था निर्माण केली जाईल अशी खात्री हेमांग अमिन यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
IPL 2021 Explainer : खेळ महत्वाचा की जीव, जाणून घ्या खेळाडू स्पर्धेतून का घेत आहेत माघार?
काय म्हणाले आहेत हेमांग अमिन?
तुमच्यापैकी अनेकांना स्पर्धा संपल्यानंतर घरी परत कसं जायचं याबद्दल मनात अनेक शंका आणि प्रश्न असतील. सध्याची परिस्थिती पाहता असे विचार मनात येणं साहजीक आहे. पण तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही, याची खात्री आम्ही देतो. स्पर्धा संपल्यानंतर तुम्ही सर्वजण घरी योग्य पद्धतीने सुखरुप पोहचाल यासाठी बीसीसीआय सर्वकाही करेल. सध्याच्या परिस्थितीवर आम्ही बारीक नजर ठेवून आहोत, तसेच स्पर्धा संपल्यानंतर तुम्हाला घरी पोहचवण्यासाठी प्रत्येक सरकारी यंत्रणा आणि अधिकाऱ्यांसोबत आमच्या चर्चा सुरु आहेत. तुमच्यापैकी प्रत्येक जण घरी सुखरुप पोहचेपर्यंत ही स्पर्धा आमच्यासाठी संपलेली नसेल.
दरम्यान दोन अंपायर्सव्यतिरीक्त आतापर्यंत जोश हेजलवूड, अँड्रू टाय, केन रिचर्डसन, अॅडम झॅम्पा आणि रविचंद्रन आश्विन या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT