IPL 2022 Mega Auction: इशान किशन सर्वात महागडा खेळाडू, सुरेश रैनासाठी कोणाचीच बोली नाही

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या आगामी हंगामासाठीचं मेगा ऑक्शन आज बंगळुरुत पार पडलं. दोन दिवस चाललेल्या या लिलावात संघमालकांनी भारतीय खेळाडूंसाठी जास्तीत जास्त पैसा खर्च करण्याकडे लक्ष दिलं. मुंबई इंडियन्सने इशान किशनसाठी १५.२५ कोटी रुपये खर्च करत त्याला संघात कायम राखलं. दुसरीकडे आयपीएलमधल्या अनुभवी खेळाडूंपैकी एक सुरेश रैनाला मात्र यंदा कोणत्याच संघाने बोली लावली नाही. सुरेश रैनासोबतच काही अनुभवी खेळाडूंची पाटी यंदा कोरीच राहिली. याव्यतिरीक्त काही युवा खेळाडूंनीही यंदाच्या लिलावात चांगल्या रकमेची बोली घेतली.

ADVERTISEMENT

जाणून घ्या काय घडलं पहिल्या दिवशी?

पहिल्या दिवसाच्या लिलावावर भारतीय खेळाडूंचं वर्चस्व पहायला मिळालं. इशान किशन, दीपक चहर, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, प्रसिध कृष्णा, हर्षल पटेल या खेळाडूंना १० कोटी आणि त्यापेक्षा जास्त रकमेची बोली लागली. दीपक चहरसाठी चेन्नई सुपरकिंग्ज संघाने १४ कोटी रुपये मोजले. मराठमोळा शार्दुल ठाकूर १० कोटी ७५ लाखांच्या बोलीवर दिल्लीच्या संघाकडून खेळणार असून मुंबईकर श्रेयस अय्यर हा १२.२५ कोटींच्या घरात कोलकाता संघाचा सदस्य झाला आहे.

हे वाचलं का?

याव्यतिरीक्त पहिल्या दिवसात कमिन्स (७ कोटी २५ लाख बोली) कोलकाता संघाकडून, कगिसो रबाडा (९ कोटी २५ लाख बोली) पंजाब संघाकडून, धवन (८ कोटी २५ लाख बोली) पंजाब संघाकडून, डु-प्लेसिस (७ कोटींची बोली) RCB संघाकडून यांना चांगल्या रकमेची बोली मिळाली. पहिल्या दिवशी कोणत्या खेळाडूवर लागली कितींची बोली? जाणून घ्या…

IPL 2022 Auction: इशान किशन पहिल्या दिवसाचा हिरो, ठरला सर्वात महागडा खेळाडू

ADVERTISEMENT

कसा गेला आयपीएल लिलावाचा दुसरा दिवस?

ADVERTISEMENT

दुसऱ्या दिवसाच्या लिलावात लिआम लिव्हींगस्टोनने बाजी मारली आहे. ११ कोटी ५० लाखांची बोली पंजाबने लावल्यामुळे लिव्हींगस्टोन दुसऱ्या दिवसाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. दुसऱ्या दिवशी पहिल्या फेरीत एडन मार्क्रमला २ कोटी ६० लाख रुपये मोजत हैदराबादने विकत घेतलं. मागच्या हंगामात दिल्लीकडून खेळणारा अजिंक्य रहाणे यंदाच्या हंगामात कोलकात्याकडून खेळताना दिसेल. कोलकाताने अजिंक्यला १ कोटींच्या बेस प्राईजवर खरेदी केलं आहे. यानंतर पहिल्या टप्प्यातले बहुतांश खेळाडू अनसोल्ड राहिले.

दुसऱ्या टप्प्यात वेस्ट इंडिजच्या ओडेन स्मिथसाठी पंजाबने ६ कोटी खर्च करुन त्याला संघात घेतलं. आफ्रिकेचा मार्को जेन्सन ४ कोटी २० लाखांच्या बोलीवर हैदराबाद संघाकडून तर मुंबईकर शिवम दुबे ४ कोटींच्या बोलीवर चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना दिसणार आहे. खलिल अहमदसाठीही दिल्लीच्या संघाने ५ कोटी २५ लाखांची रक्कम मोजली.

लंच सेशननंतरचा टप्पा भारताच्या U-19 वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूंनी गाजवला. ज्यात कर्णधार यश धुलसाठी दिल्लीने ५० लाख रुपये मोजले. अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या राज अंगद बावासाठी पंजाबने २ कोटी तर महाराष्ट्राच्या राजवर्धन हांगर्गेकरसाठी चेन्नईने दीड कोटी रुपये मोजले. मुंबई इंडियन्सने Accelerated खेळाडूंच्या यादीत टामय मिल्स आणि टीम डेवीड यांच्यासाठी मोठ्या रक्कम मोजत त्यांना आपल्या संघात घेतलं आहे.

उस्मानाबादच्या राजवर्धनसाठी चेन्नईने लावली ताकद; कोण आहे राजवर्धन हंगरगेकर?

दुसऱ्या दिवसाच्या अंतिम टप्प्यातील लिलावाला सुरुवात –

१) फॅबिअन एलन ७५ लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्सकडून खेळणार

२) डेव्हिड विली २ कोटींच्या बोलीवर RCB कडून खेळणार

३) अमन खान २० लाखांच्या बोलीवर KKR कडून खेळणार

४) शिवांक वशिष्ट अनसोल्ड

५) राहुल चंद्रोल अनसोल्ड

६) कुलवंत खेजरोलिया अनसोल्ड

७) आकाश मधवाल अनसोल्ड

दुसऱ्या दिवसाच्या अंतिम टप्प्यातील लिलावाला सुरुवात –

१) अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीवर १ कोटींची बोली, KKR कडून खेळणार

२) उमेश यादव अखेरच्या फेरीत ठरला लकी, २ कोटींच्या रकमेवर KKR ने घेतलं विकत

३) जेम्स निशमचं नशीब अखेरच्या फेरीत उजळलं, १ कोटी ५० लाखांच्या बोलीवर राजस्थानने घेतलं विकत

४) नेथन कुल्टर-नाईल २ कोटींच्या बोलीवर राजस्थान रॉयल्सकडून खेळणार

५) इशांत शर्मा अखेरच्या टप्प्यातही अनसोल्ड

६) कैस अहमद सलग तिसऱ्यांदा अनसोल्ड

७) महाराष्ट्राच्या विकी ओत्सवालवर २० लाखांची बोली, दिल्लीच्या संघाने घेतलं विकत

८) रासी वान डर डुसेन १ कोटींच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार

९) डॅरेल मिचेल ७५ लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्सकडून खेळणार

१०) सिद्धार्थ कौल ७५ लाखांच्या बोलीवर RCB कडून खेळणार

११) अँड्रू टाय पुन्हा एकदा अनसोल्ड

१२) रोहन कदम अनसोल्ड

१२) समीर रिझवी पुन्हा एकदा अनसोल्ड, एकाही संघाकडून बोली नाही

१३) बी. साई सुदर्शन २० लाखांच्या बोलीवर गुजरात संघाकडून खेळणार

१४) आर्यन जुयाल २० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्सकडून खेळणार

१५) लवनिथ सिसोदीया २० लाखांच्या बोलीवर RCB कडून खेळणार

दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात –

१) शुभम शर्मा अनसोल्ड

२) के. भगत वर्मा २० लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणार

३) चिंतल रेड्डी अनसोल्ड

४) भरत शर्मा पुन्हा एकदा अनसोल्ड

५) पराग शर्मा अनसोल्ड

६) अर्जुन तेंडुलकर ३० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्सकडून खेळणार

७) शुभम गढवाल २० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडे

८) दुआन यानसेन अनसोल्ड

९) खिजर दफेदार अनसोल्ड

१०) रोहन राणा अनसोल्ड

IPL 2022 : अर्जुन तेंडुलकर पुन्हा मुंबई इंडियन्सकडेच, पण ‘त्या’ संघामुळे भाव वाढला

दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात –

१) मथिशा पथिराना अनसोल्ड

२) कुलदीप यादव २० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार

३) न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो अनसोल्ड

४) वरुण एरॉन ५० लाखांच्या बोलीवर गुजरात संघाकडून खेळणार

५) ब्लेसिंग मुजारबानी पुन्हा एकदा अनसोल्ड

६) शिवांक वशिष्ट अनसोल्ड, कोणत्याही संघाकडून बोली नाही

७) रमेश कुमार २० लाखांच्या बोलीवर KKR संघाकडून खेळणार

८) गेराल्ड कोएत्झी अनसोल्ड

९) ऋतिक शौकीन २० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्सकडून खेळणार

१०) प्रत्युष सिंग अनसोल्ड

दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात –

१) मोएजेस हेन्रिकेज अनसोल्ड

२) वेस्ट इंडिजच्या अकील हुसैन अनसोल्ड

३) स्कॉट कुग्लायएन अनसोल्ड

४) गुरकिरत सिंग ५० लाखांच्या बोलीवर गुजरात संघाकडून खेळणार

५) केन रिचर्डसन सलग दुसऱ्या फेरीत अनसोल्ड

६) टीम साऊदीवर लागतेय बोली, KKR ने १.५० कोटी मोजत घेतलं संघात

७) राहुल बुधी २० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार

८) बेनी होवेल ४० लाखांच्या बोलीवर पंजाब किंग्ज संघाकडून खेळणार

९) अतित शेठ सलग दुसऱ्यांना अनसोल्ड

१०) उत्कर्ष सिंहही अनसोल्ड

दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात –

१) ग्लेन फिलीप्स १ कोटी ५० लाखांच्या बोलीवर हैदराबाद संघाकडून खेळणार

२) टीम सैफर्टवर दिल्ली कॅपिटल्सची बोली, ५० लाखांच्या बोलीवर घेतलं संघात

३) नेथन एलिस ७५ लाखांच्या बोलीवर पंजाबच्या संघाकडून खेळणार

४) फैजल फारुखी ५० लाखांच्या बोलीवर हैदराबादकडून खेळणार

५) रिस टोप्ली सलग दुसऱ्या फेरीत अनसोल्ड

६) अँड्रू टायही सलग दुसऱ्या फेरीत अनसोल्ड, कोणत्याही संघाची बोली नाही

७) तन्मय अग्रवाल पुन्हा एकदा अनसोल्ड

८) समीर रिझवी अनसोल्ड

९) रमणदीप सिंग २० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार

१०) बी. साई सुदर्शन सलग दुसऱ्या फेरीत अनसोल्ड

११) अथर्व तायडेवर दुसऱ्या फेरीत बोली, २० लाखांच्या बोलीवर पंजाबच्या संघाने घेतलं विकत

१२) ध्रुव जुरेल २० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार

१३) मयांक यादव २० लाखांच्या बोलीवर लखनऊ सुपरजाएंट संघाकडून खेळणार

१४) तेजस बरोका २० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्सकडे

१५) श्रीलंकेचा भानुका राजपक्षावर लागतेय बोली, पंजाबने ५० लाखांच्या बोलीवर घेतलं संघात

दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात –

१) ख्रिस जॉर्डन ३ कोटी ६० लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणार

२) जेम्स निशम दुसऱ्या फेरीतही अनसोल्ड

३) शेल्डन कोट्रेलही सलग दुसऱ्या फेरीत अनसोल्ड

४) लुन्गिसानी एन्गिडी ५० लाखांच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार

५) कैस अहमद सलग दुसऱ्या फेरीत अनसोल्ड

६) कर्ण शर्मावर दुसऱ्या फेरीत बोली, ५० लाख रुपये मोजत RCB ने घेतलं आपल्या संघात

७) हर्नुर सिंग अनसोल्ड, सलग दुसऱ्या फेरीत कोणीही बोली लावली नाही

८) कुलदीप सेन २० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्सकडून खेळणार

९) मुज्तबा युसूफ सलग दुसऱ्या फेरीत अनसोल्ड

१०) इंग्लंडच्या हेल्सवर दुसऱ्या टप्प्यात बोली, १ कोटी ५० लाख मोजत KKR ने घेतलं आपल्या संघात

११) एविन लुईसवर दुसऱ्या फेरीत बोली, २ कोटी रुपये मोजत गुजरातने घेतलं विकत

१२) दुसऱ्या फेरीत करुण नायरचं नशिब उघडलं, कोलकाता आणि बंगळुरुकडून लावली जातेय बोली. राजस्थानची ऐनवेळी स्पर्धेत एंट्री, १ कोटी ४० लाखांची बोली लावत करुण नायरला घेतलं संघात

१३) चरिथ असलंका सलग दुसऱ्या फेरीत अनसोल्ड

१४) रेहमनुल्ला गुरबाजही सलग दुसऱ्या फेरीत अनसोल्ड

१५) बेन मॅक्डरर्मट अनसोल्ड

दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात –

१) पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिलेल्या मिलरवर लावली जातेय बोली. ३ कोटींच्या बोलीवर गुजरात टायटन्स संघाने मिलरला घेतलं विकत

२) बांगलादेशचा शाकीब अल हसन दुसऱ्या फेरीतही अनसोल्ड

३) सॅम बिलींग्ज २ कोटींच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार

४) वृद्धीमान साहाचं नशिब पालटलं, दुसऱ्या दिवशी अखेरच्या टप्प्यात चेन्नई आणि गुजरातने लावली बोली. अखेरीस १ कोटी ९० लाखांच्या बोलीवर वृद्धीमान गुजरातच्या संघाकडून खेळणार

५) मॅथ्यू वेडवरही अखेरच्या टप्प्यात बोली, गुजरात आणि पंजाबचा संघ शर्यतीत. अखेरीस २ कोटी ४० लाखांच्या बोलीवर वेड गुजरातच्या संघात दाखल.

६) उमेश यादववर दुसऱ्या दिवसातही बोली लागली नाही.

७) सी. हरी निशांतवर २० लाखांची बोली लावत चेन्नईने घेतलं आपल्या संघात

८) अनमोलप्रीत सिंग २० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार

९) एन. जगदीशन २० लाखांच्या बोलीवर चेन्नईकडून खेळणार

१०) विष्णु विनोद ५० लाखांच्या बोलीवर हैदराबाद संघाकडून खेळणार

दुसऱ्या टप्प्यातील Accelerated Players चं ऑक्शन पुढे सुरु –

१) अंश पटेल २० लाखांच्या बोलीवर पंजाबच्या संघाकडून खेळणार

२) अशोक शर्मा ५५ लाखांच्या बोलीवर KKR संघाकडून खेळणार

३) आशुतोष शर्मा पहिल्या फेरीत अनसोल्ड

४) अरुणय सिंग २० लाखांच्या बोलीवर राजस्थान संघाकडून खेळणार

दुसऱ्या टप्प्यातील Accelerated Players चं ऑक्शन पुढे सुरु –

१) प्रदीप सांगवान २० लाखांच्या बोलीवर गुजरात सुपरजाएंट संघाकडून खेळणार

२) महाराष्ट्राच्या कौशल तांबेवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाची बोली नाही.

३) मुकेश कुमार सिंग पहिल्या फेरीत अनसोल्ड

४) प्रथम सिंग २० लाखांच्या बोलीवर KKR कडून खेळणार

५) रितीक चॅटर्जी २० लाखांच्या बोलीवर पंजाबकडून खेळणार

६) निनाद राथ्वा पहिल्या फेरीत अनसोल्ड

७) रितीक शौकीन पहिल्या फेरीत अनसोल्ड

८) शशांक सिंग २० लाखांच्या बोलीवर हैदराबादकडून खेळणार

९) काएल मिल्स ५० लाखांच्या बोलीवर लखनऊ संघाकडून खेळणार

१०) अमित अली पहिल्या फेरीत अनसोल्ड

११) करण शर्मा, २० लाखांच्या बोलीवर लखनऊ संघाकडून खेळणार

१२) बलतेज ढांडा २० लाखांच्या बोलीवर पंजाबकडून खेळणार

१३) सौरभ दुबे २० लाखांच्या बोलीवर हैदराबादकडून खेळणार

१४) ललित यादववर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाची बोली नाही

१५) मोहम्मद अरशद खान २० लाखांच्या बोलीवर मुंबईकडून खेळणार

दुसऱ्या टप्प्यातील Accelerated Players चं ऑक्शन पुढे सुरु –

१) हेडन कर पहिल्या फेरीत अनसोल्ड

२) सौरभ कुमार पहिल्या फेरीत अनसोल्ड

३) शम्स मुलानीही पहिल्या फेरीत अनसोल्ड

४) ध्रुव पटेलही अनसोल्ड, सलग चौथा खेळाडूवर कोणीही बोली लावली नाही

५) अतित शेठ अनसोल्ड

६) डेविड विसावर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाची बोली नाही, अनसोल्ड

७) बाबा अपराजितवर कोलकाता नाईट रायडर्सची २० लाखांची बोली

८) केन्नार लुईसही पहिल्या फेरीत अनसोल्ड

९) बी.आर.शरथ पहिल्या फेरीत अनसोल्ड, एकाही संघाची बोली नाही

१०) सुशांत मिश्रा अनसोल्ड

११) चमिका करुणरत्नेवर KKR ची बोली, ५० लाखांची बोली लावत घेतलं संघात

१२) डेव्हिड विलीवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाची बोली नाही.

१३) ब्लेसिंग मुजारबानीही पहिल्या फेरीत अनसोल्ड

१४) आर.समर्थ २० लाखांच्या बोलीवर हैदराबाद संघाकडून खेळणार

१५) अभिजीत तोमरवर KKR ची बोली, राजस्थानही उतरलं शर्यतीत. ४० लाखांच्या बोलीवर अभिजीत तोमर KKR च्या ताफ्यात

दुसऱ्या टप्प्यातील Accelerated Players च्या ऑक्शनला सुरुवात –

१) न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलवर पहिल्या फेरीत बोली नाही

२) श्रीलंकेचा भानुका राजपक्षाही पहिल्या फेरीत अनसोल्ड

३) रोस्टन चेस पहिल्या फेरीत अनसोल्ड, कोणत्याही संघाची बोली नाही

४) बेन कटींगवरही पहिल्या फेरीत कोणत्याही संघाची बोली नाही

५) पवन नेगीची झोळीही रिकामीच, राहिला अनसोल्ड

६) शॉन एबटवर बोलीला सुरुवात, २ कोटी ४० लाखांच्या बोलीवर हैदराबादने घेतलं एबटला विकत

७) अल्झारी जोसेफवर बोलीला सुरुवात, २ कोटी ४० लाखांच्या बोलीवर गुजरात टायटन्स संघाने जोसेफला घेतलं विकत

८) मुंबईच्या धवल कुलकर्णीवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही

९) रायले मेर्डीथ १ कोटींच्या बोलीवर मुंबई इंडियन्सकडून खेळणार

१०) केन रिचर्डसनवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही

११) राहुल बुधी पहिल्या फेरीत अनसोल्ड

१२) लॉरी एवन्स पहिल्या फएरीत अनसोल्ड

१३) आयुश बदानी २० लाखांच्या बोलीवर लखनऊ संघाकडून खेळणार

१४) अनिश्वर गौतम २० लाखांच्या बोलीवर RCB संघाकडून खेळणार

१५) वेनी होवेल पहिल्या फेरीत अनसोल्ड

Accelerated यादीतल्या खेळाडूंचं ऑक्शन सुरु –

१) बेन ड्वारशियसवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.

२) पंकज जैस्वालवर कोणत्याही संघाकडून बोली नाही.

३) मोहसीन खान २० लाखांच्या बोलीवर लखनऊ संघाकडून खेळणार

४) चामा मिलींद २५ लाखांच्या बोलीवर, RCB कडून खेळणार

५) मयांक यादववर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाची बोली नाही.

६) तेजस बरोका पहिल्या फेरीत अनसोल्ड, कोणत्याही संघाची बोली नाही

७) युवराज चुडासमा अनसोल्ड, कोणाचीही बोली नाही.

८) प्रशांत सोलंकीवर लावली जात आहे बोली, राजस्थान आणि चेन्नईत सुरु आहे चढाओढ. १ कोटी २० लाखांच्या बोलीवर प्रशांत सोलंकी चेन्नईच्या संघाकडून खेळणार

९) मिथुन सुदेसनवर कोणत्याही संघाची बोली लागली नाही.

आठव्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाची यादी, पुढे चालू…

३३) शुभ्रांशु सेनापती २० लाखांच्या बोलीवर चेन्नईच्या संघाकडून खेळणार

३४) अपुर्व वानखेडे पहिल्या फेरीत अनसोल्ड

३५) मुंबईच्या अथर्व अंकोलेकरवर कोणत्याही संघाची बोली नाही.

३६) टीम डेवीडवर लावली जातेय बोली, तीन ते चार संघांमध्ये रंगलेल्या शर्यतीत मुंबई इंडियन्सने मारली बाजी. टीम डेव्हीड ८ कोटी २५ लाखांच्या बोलीवर मुंबईकडून खेळणार

३७) प्रवीण दुबे ५० लाखांच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार

३८) प्रेरक मंकड २० लाखांच्या बोलीवर पंजाबच्या संघाकडून खेळणार

३९) गोव्याच्या सुयश प्रभुदेसाईवर पुन्हा RCB ची बोली, ३० लाखांच्या बोलीवर घेतलं संघात

४०) रमणदीप सिंहवर कोणत्याही संघाची बोली नाही

४१) बी. साई सुदर्शनवर कोणत्याही संघाची बोली नाही

४२) अथर्व तायडेवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाची बोली नाही.

४३) प्रशांत चोप्रावर कोणत्याही संघाची बोली नाही.

४४) ध्रुव जुरेलवरही पहिल्या फेरीत कोणत्याही संघाची बोली नाही.

४५) आर्यन जुयालवर कोणत्याही संघाची बोली नाही.

४६) वैभव अरोडावर लावली जात आहे बोली, २ कोटींच्या बोलीवर यंदा पंजाबकडून खेळणार

४७) मुकेश चौधरी २० लाखांच्या बोलीवर चेन्नई संघाकडून खेळणार

४८) रसिक दारवर लावली जात आहे बोली, २० लाखांच्या बोलीवर KKR कडून खेळणार रसिक

आठव्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाची यादी, पुढे चालू…

१७) रेहमनुल्ला गुरबाज पहिल्या फेरीत अनसोल्ड

१८) बेन मॅक्डरमटही पहिल्या फेरीत अनसोल्ड

१९) ग्लेन फिलीफ्स पहिल्या फेरीत अनसोल्ड

२०) जेसन बेहरनडॉर्फवर बोलीला सुरुवात, ७५ लाखांच्या बोलीवर बेहरनडॉर्फ RCB कडून खेळणार

२१) नेथन एलिस पहिल्या फेरीत अनसोल्ड

२२) फैजलहक फारुखी पहिल्या फेरीत अनसोल्ड

२३) सिद्धार्थ कौलही पहिल्या फेरीत अनसोल्ड

२४) ओबेद मकॉयवर लावली जात आहे बोली, ७५ लाखांच्या बोलीवर राजस्थानच्या संघाकडून खेळणार ओबेद

२५) टायमल मिल्सवर लावली जात आहे बोली, दीड कोटींच्या बोलीवर मुंबई इंडियन्सने घेतलं संघात.

२६) एडम मिल्नवर लावली जात आहे बोली, १ कोटी ९० लाखांच्या बोलीवर चेन्नई संघाकडून खेळणार.

२७) रिस टोप्ली पहिल्या फेरीत अनसोल्ड

२८) अँड्रू टाय पहिल्या फेरीत अनसोल्ड

२९) संदीप वारियर पहिल्या फेरीत अनसोल्ड

३०) तन्मय अग्रवाल पहिल्या फेरीत अनसोल्ड

३१) टॉम केलर-कॅडमोर पहिल्या फेरीत अनसोल्ड, कोणत्याही संघाने बोली लावली नाही

३२) भारतीय फलंदाज समीर रिझवीही अनसोल्ड

आठव्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात – (Accelerated Players List)

१) फिन एलन ८० लाखांच्या बोलीवर RCB संघाकडून खेळणार

२) डेवन कॉनवे १ कोटींच्या बोलीवर CSK संघाकडून खेळणार

३) इंग्लंडच्या हेल्सवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही

४) वेस्ट इंडिजच्या एविन लुईसवरही कोणत्याही संघाने बोली लावली नाही

५) सलग तिसरा खेळाडू अनसोल्ड, करुण नायरवरही बोली लागली नाही

६) विंडीजच्या रोव्हमन पॉवेलवर लावली जात आहे बोली, २ कोटी ८० लाखांच्या बोलीवर दिल्लीने घेतलं आपल्या संघात.

७) रासी वान डर डुसेन पहिल्या फेरीत अनसोल्ड, कोणत्याही संघाकडून बोली नाही.

८) जोफ्रा आर्चरवर मुंबई इंडियन्सची बोली, ८ कोटींमध्ये घेतलं विकत

९) श्रीलंकेच्या चरिथ असलंकावर बोली नाही, अनसोल्ड

१०) रिषी धवनवर ५५ लाखांची बोली, पंजाबच्या संघाकडून खेळणार

११) जॉर्ज गार्टनवर बोली नाही, अनसोल्ड

१२) ड्वेन प्रिटोरियस ५० लाखांच्या बोलीवर चेन्नईकडून खेळणार

१३) शर्फेन रुदरफोर्ड १ कोटींच्या बोलीवर RCB कडून खेळणार

१४) डॅनिअल सम्सवर २ कोटी ६० लाखांच्या बोली लावत मुंबई इंडियन्सने घेतलं विकत

१५) मिचेल सँटनरवर लावली जात आहे बोली, चेन्नई आणि हैदराबादमध्ये सुरु आहे चढाओढ. १ कोटी ९० लाखांच्या बोलीवर सँटनर चेन्नईकडून खेळणार.

१६) रोमारियो शेफर्डवर लावली जात आहे बोली, ७ कोटी ७५ लाखांच्या बोलीवर शेफर्ड हैदराबाद संघाकडून खेळणार

IPL 2022 : यंदाच्या स्पर्धेत सहभागी होणार नाही तरीही मुंबईने ‘या’ खेळाडूसाठी मोजले ८ कोटी

सातव्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात – (Uncapped Fast Bowlers)

१) वासु वत्सवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.

२) यश ठाकूरही पहिल्या फेरीत अनसोल्ड

३) अर्जन नागस्वालाही पहिल्या फेरीत अनसोल्ड

४) यश दयालवर लावली जात आहे बोली, गुजरात आणि RCB मध्ये यशसाठी चढाओढ. अखेरीस ३ कोटी २० लाखांच्या बोलीवर यश गुजरातच्या संघात दाखल

५) सिमरजीत सिंग २० लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणार.

६) मुज्तबा युसूफ पहिल्या फेरीत अनसोल्ड, कोणत्याही संघाकडून बोली नाही.

७) कुलदीप सेनही पहिल्या फेरीत अनसोल्ड, कोणत्याही संघाकडून बोली नाही.

८) आकाश सिंगवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.

सहाव्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात – (Uncapped All Rounders)

१) ललित यादववर लावली जात आहे बोली, ६५ लाखांच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्स संघाने घेतलं विकत

२) रिपल पटेल २० लाखांच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार

३) U-19 विश्वचषक विजेता कर्णधार यश धुलवर लावली जात आहे बोली, दिल्ली आणि पंजाबमध्ये लावली जात आहे बोली. ५० लाखांच्या बोलीवर दिल्लीने घेतलं यशला आपल्या संघात.

४) एन. तिलक वर्मावर लावली जात आहे बोली, सुरुवातीला हैदराबाद आणि राजस्थानमध्ये चढाओढ. राजस्थानची स्पर्धेतून माघार आणि चेन्नईची स्पर्धेत एंट्री. मुंबई इंडियन्सही शर्यतीत दाखल. तिलक वर्माने ओलांडला १ कोटींचा टप्पा. अखेरीस १ कोटी ७० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्सने तिलक वर्माला घेतलं संघात.

५) महिपाल लोमरोर, ९५ लाखांच्या बोलीवर RCB कडून खेळणार.

६) अनुकुल रॉय २० लाखांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार.

७) महाराष्ट्राच्या दर्शन नळकांडेवर गुजरातची बोली, २० लाखांच्या बोलीवर घेतलं संघात.

८) आणखी एक महाराष्ट्राचा खेळाडू मैदानात, विकी ओत्सवालवर लावली जात आहे बोली, परंतू पहिल्या फेरीत विकी ओत्सवाल अनसोल्ड

९) संजय यादववर लावली जात आहे बोली, मुंबई आणि पंजाबमध्ये चढाओढ सुरु. ५० लाखांच्या बोलीवर संजय यादव मुंबई इंडियन्सकडून खेळणार.

१०) राज अंगद बावावर लावली जात आहे बोली. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत राजने दाखवली होती आपली चमक. हैदराबाद, पंजाब आणि मुंबईत राजसाठी चढाओढ सुरु. २ कोटी रुपये मोजत राज अंगद बावाला पंजाबने घेतलं आपल्या संघात

११) महाराष्ट्राच्या राजवर्धन हंगर्गेकरवर बोलीला सुरुवात, मुंबई आणि लखनऊ मध्ये सुरु आहे चढाओढ. लखनऊची स्पर्धेतून माघार आणि चेन्नई शर्यतीत दाखल. १ कोटी ५० लाखांच्या बोलीवर राजवर्धन चेन्नईच्या संघात दाखल.

कल्याणचा तुषार देशपांडे आयपीएलमध्ये धोनीसोबत खेळणार, भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न

पाचव्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात – (Uncapped Batsman)

१) विराट सिंग, हिम्मत सिंग, सचिन बेबी, हर्नुर सिंग, हिमांशु राणा पहिल्या फेरीत अनसोल्ड, कोणत्याही संघाकडून बोली नाही.

२) रिंकू सिंग ५५ लाखांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार.

३) मनन व्होरा २० लाखांच्या बोलीवर लखनऊ सुपरजाएंट संघाकडून खेळणार.

४) रिकी भुई पहिल्या फेरीत अनसोल्ड, कोणत्याही संघाकडून बोली नाही.

चौथ्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात – (Spinners)

१) मयांक मार्कंडेवर लावली जात आहे बोली, ६५ लाखांच्या बोलीवर मयांक मुंबई इंडियन्सकडून खेळणार.

२) तबरेज शम्सीवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.

३) कैस अहमद पहिल्या फेरीत अनसोल्ड, कोणत्याही संघाकडून बोली नाही.

४) शाहबाज नदीम ५० लाखांच्या बोलीवर लखनऊ संघाकडून खेळणार.

५) महीष तिक्ष्णावर पहिल्या फेरीत लावली जात आहे बोली, ७० लाखांच्या बोलीवर चेन्नईच्या संघाकडून खेळणार श्रीलंकेचा फिरकीपटू.

६) कर्ण शर्मावर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.

७) न्यूझीलंडच्या इश सोधीवरही पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.

८) पियुष चावलाही पहिल्या फेरीत अनसोल्ड, कोणत्याही संघाने लावली नाही बोली.

IPL 2022 : अमरावतीकर जितेश शर्मावर पंजाब किंग्सची बोली, २० लाखांची रक्कम मोजत घेतलं संघात

तिसऱ्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात – (Bowlers)

१) अनुभवी इशांत शर्मावर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.

२) खलिल अहमदवर लावली जात आहे बोली, पहिल्या फेरीत मुंबई आणि दिल्लीमध्ये चुरस. ५ कोटी २५ लाखांच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्सने घेतलं संघात

३) श्रीलंकेच्या दुष्मंता चमिरासाठी लावली जात आहे बोली, RCB आणि लखनऊ संघात सुरु आहे चुरस…२ कोटींच्या बोलीवर लनखऊ संघाकडून खेळणार चमिरा.

४) दक्षिण आफ्रिकेच्या लुन्गिसानी एन्गिडीवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.

५) युवा चेतन साकरियावर लावली जात आहे बोली, ४ कोटी २० लाखांच्या बोलीवर दिल्लीच्या संघाने चेतनला घेतलं आपल्या संघात.

६) संदीप शर्मा ५० लाखांच्या बोलीवर पंजाब किंग्ज संघाकडून खेळणार.

७) नवदीप सैनीवर लावली जात आहे बोली, लखनऊ आणि मुंबई इंडियन्समध्ये चुरस सुरु. लखनऊ स्पर्धेतून माघार, राजस्थानची एंट्री. २ कोटी ६० लाखांच्या बोलीवर नवदीप राजस्थान संघाकडून खेळणार

८) शेल्डन कोट्रेलवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.

९) जयदेव उनाडकट १ कोटी ३० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्सकडून खेळणार.

१०) नॅथन कुल्टर-नाईलवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.

दुसऱ्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात – (All Rounders)

१) लिआम लिव्हींगस्टोनवर लावली जात आहे बोली, पहिल्या फेरीत कोलकाता आणि पंजाबमध्ये चढाओढ. १ कोटींच्या बेस प्राईजवरुन लिव्हींगस्टोनची ८ कोटींपर्यंत मजल. कोलकाता शर्यतीतून बाहेर गुजरातची एंट्री. लिव्हींगस्टोनने पार केला १० कोटींचा टप्पा. अखेरीस १० कोटी २५ लाखांच्या बोलीवर गुजरात बाहेर पडल्यानंतर हैदराबादची स्पर्धेत एंट्री. आता पंजाब आणि हैदराबादमध्ये लिव्हींगस्टोनसाठी चुरस सुरु. ११ कोटी ५० लाखांच्या बोलीवर लिव्हींगस्टोन पंजाबच्या संघात दाखल

२) डॉमनिक ड्रेक्स १ कोटी १० लाखांच्या बोलीवर गुजरात टायटन्स संघाकडून खेळणार.

३) न्यूझीलंडच्या जेम्स निशमवर लावली जात आहे बोली, परंतू पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून निशमवर बोली नाही.

४) ऑफ स्पिनर जयंत यादववर लावली जात आहे बोली, १ कोटी ७० लाखांच्या बोलीवर गुजरात संघाकडून खेळणार जयंत.

५) विजय शंकर १ कोटी ४० लाखांच्या बोलीवर गुजरात जाएंट संघाकडून खेळणार.

६) इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.

७) वेस्ट इंडिजच्या ओडीन स्मिथवर लावली जात आहे बोली, स्मिथसाठी तीन संघांमध्ये चुरस. पंजाब, हैदराबाद आणि राजस्थान संघाकडून लावली जात आहे बोली. राजस्थानची स्पर्धेतून माघार आता पंजाब आणि हैदराबादमध्ये लढाईला सुरुवात. अखेरीस ६ कोटींच्या बोलीवर स्मिथ पंजाबच्या ताफ्यात दाखल

८) दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जेन्सनवर लावली जात आहे बोली, पहिल्या फेरीत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये चढाओढ. राजस्थानची स्पर्धेतून माघार आणि हैदराबाद स्पर्धेत दाखल. अखेरीस जेन्सन ४ कोटी २० लाखांच्या बोलीवर हैदराबाद संघात दाखल.

९) मुंबईकर शिवम दुबेवर लावली जात आहे बोली, लखनऊ आणि राजस्थानमध्ये शिवम दुबेसाठी चढाओढ सुरु. कालांतराने पंजाबचीही स्पर्धेत एंट्री. लागोपाठ चेन्नई सुपरकिंग्जही शर्यतीत दाखल. अखेरीस ४ कोटींच्या बोलीवर शिवम चेन्नईच्या संघात दाखल.

१०) कृष्णप्पा गौथमवर लावली जात आहे बोली. लखनऊ आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात सुरु आहे चुरस. कोलकात्याची स्पर्धेतून माघार, दिल्ली कॅपिटल्स शर्यतीत दाखल. दिल्लीचीही तात्काळ माघार आणि ९० लाखांच्या बोलीवर गौथम लखनऊ संघात दाखल.

पहिल्या टप्प्यातील खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात – (Capped Batsman)

१) दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्क्रमवर लागत आहे बोली…पंजाब, हैदराबाद आणि मुंबईच्या लढतीत अखेरीस हैदराबादची बाजी. २ कोटी ६० लाखांच्या बोलीवर मार्क्रम हैदराबादकडून खेळणार

२) मुंबईकर अजिंक्य रहाणेवर कोलकाता नाईट रायडर्सची बोली, १ कोटींच्या बोलीवर घेतलं विकत

३) डेविड मलानवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाची बोली नाही.

४) मनदीप सिंगवर लागत आहे बोली, १ कोटी १० लाखांच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्सने घेतलं विकत.

५) मार्नस लाबुशेन पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.

६) इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही.

७) सलग तिसरा खेळाडू अनसोल्ड, सौरभ तिवारीवरही कोणत्याही संघाकडून बोली नाही.

८) अरॉन फिंचची झोळी रिकामी, पहिल्या फेरीत अनसोल्ड

९) भारताच्या चेतेश्वर पुजारावर कोणत्याही संघाची बोली नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT