IPL 2022 : पहिल्या विजयानंतर मुंबईचा हुरुप वाढला
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सलग आठ पराभवांनंतर मुंबई इंडियन्सने पहिला विजय मिळवला आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर मुंबईच्या संघाचा हुरुप काहीसा वाढला आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी नवी मुंबईत आपापसात एक सराव सामना खेळला. मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलेलं असलं तरीही उर्वरित सामन्यांमध्ये खेळाडू आपली छाप पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. सराव सामन्यादरम्यान मयांक मार्कंडे, डेवाल्ड […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सलग आठ पराभवांनंतर मुंबई इंडियन्सने पहिला विजय मिळवला आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर मुंबईच्या संघाचा हुरुप काहीसा वाढला आहे.
हे वाचलं का?
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी नवी मुंबईत आपापसात एक सराव सामना खेळला.
ADVERTISEMENT
मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलेलं असलं तरीही उर्वरित सामन्यांमध्ये खेळाडू आपली छाप पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. सराव सामन्यादरम्यान मयांक मार्कंडे, डेवाल्ड ब्रेविस आणि प्रशिक्षक रॉबिन सिंग
ADVERTISEMENT
इशान किशनने या सामन्यात चांगला सराव करुन घेतला. गेल्या काही सामन्यांपासून इशान किशनचा ढासळलेला फॉर्म मुंबईसाठी चिंतेचा विषय बनला होता.
राजस्थानविरुद्ध सामन्यात आपली छाप पाडणारा मुंबईचा कुमार कार्तिकेय सिंग सरावसामन्यादरम्यान गोलंदाजी करताना
मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धन संघाच्या सरावावर विशेष लक्ष ठेवून होता.
फिरकीपटू मुर्गन आश्विन सराव सामन्यादरम्यान…
आठ पराभवांनंतर मुंबईचं आव्हान संपुष्टात आलेलं असलं तरीही हा संघ आता उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करुन इतर संघांचं प्ले-ऑफसाठीचं गणित बिघडवण्याचा प्रयत्न करु शकतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT