संघटनेवर केलेली टीका भोवली, Neeraj Chopra चे प्रशिक्षक Uwe Hohn यांची उचलबांगडी
टोकियो ऑलिम्पिकमध्ये अखेरच्या दिवशी भालाफेकीत गोल्ड मेडल मिळवणाऱ्या भारताच्या नीरज चोप्राच्या प्रशिक्षकांची उचलबांगडी करण्यात आली आहे. नीरजचे जर्मन प्रशिक्षक उवे हॉन यांना Athletics Federation of India ने पदावरुन काढून टाकलंय. अॅथलेटिक्समध्ये १०० मी. पर्यंत भाला फेकणारे खेळाडू म्हणून उवे हॉन यांची ओळख आहे. २०१७ साली Athletics Federation of India ने नीरजला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची नेमणूक […]
ADVERTISEMENT
टोकियो ऑलिम्पिकमध्ये अखेरच्या दिवशी भालाफेकीत गोल्ड मेडल मिळवणाऱ्या भारताच्या नीरज चोप्राच्या प्रशिक्षकांची उचलबांगडी करण्यात आली आहे. नीरजचे जर्मन प्रशिक्षक उवे हॉन यांना Athletics Federation of India ने पदावरुन काढून टाकलंय. अॅथलेटिक्समध्ये १०० मी. पर्यंत भाला फेकणारे खेळाडू म्हणून उवे हॉन यांची ओळख आहे. २०१७ साली Athletics Federation of India ने नीरजला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची नेमणूक केली होती.
ADVERTISEMENT
उवे हॉन यांच्याच मार्गदर्शनाखाली नीरज चोप्राने २०१८ सालच्या आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये नीरजने उवे यांच्या मार्गदर्शनाखालीच गोल्ड मेडल जिंकलं होतं. Athletics Federation of India चे आदिल सुमेरीवाला यांच्या अध्यक्षतेखाली खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांच्या कामगिरीचं मुल्यांकन करण्यात आलं. ज्यात उवे हॉन यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. उवे यांची कामगिरी फारशी चांगली नाही, त्यामुळे त्यांच्या जागेवर आम्ही दोन नवे प्रशिक्षक आणणार आहोत अशी माहिती सुमेरीवाला यांनी दिली.
याव्यतिरीक्त टोकियो ऑलिम्पिकसाठी नीरज चोप्राला मार्गदर्शन करणारे Biomechanical Expert क्लाउस बार्तोनित्झ यांना मात्र मुदतवाढ मिळाली आहे. खेळाडूंची कामगिरी जेवढी चांगली व्हावी यासाठी आम्ही जे करायला हवं आहे ते करतोय, अशी माहिती सुमेरीवाला यांनी दिली. नीरज चोप्रा, शिवपाल सिंग आणि अनु राणी हे तिन्ही खेळाडू आता उवे हॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करु इच्छित नाहीत. त्यामुळे आम्ही क्लाउस बार्तोनित्झ यांना मुदतवाढ दिली आहे. भालाफेकीसाठी चांगले प्रशिक्षक मिळणं सोपं नाहीये, पण तरीही आम्ही खेळाडूंना चांगल्यातले चांगले कोच मिळावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचं AFI च्या प्लानिंग कमिशनचे प्रमुख ललित भानोत यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
Tokyo Olympics मध्ये सुवर्णाध्याय लिहिणाऱ्या Neeraj Chopra चं महाराष्ट्र कनेक्शन माहिती आहे का?
शिवपाल सिंग आणि अनु राणी यांनी टोकियोसाठी उवे हॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. म्हणूनच त्यांची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नाही. यासाठीच त्यांना हॉन यांना परत पाठवण्यात येतंय. ऑलिम्पिक स्पर्धेआधी उवे हॉन यांनी Athletics Federation of India च्या कारभारावर टीका करत या लोकांसोबत काम करणं कठीण असल्याचं वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे संघटनेचे पदाधिकारी हॉन यांच्यावर नाराज होते. त्यामुळे आता हॉन यांच्या जागी कोणाची नियुक्ती होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT