T-20 World Cup : तो आला आणि कामालाही लागला, मेंटॉर धोनीला नव्या रुपात पाहिलंत का?
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचं विजेतेपद मिळवलेल्या महेंद्रसिंह धोनीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय. विशेषकरुन मागच्या वर्षी साखळी फेरीतचं आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नईने जबरदस्त मुसंडी मारत पहिल्यापासून आपला दबदबा कायम राखत विजेतेपद मिळवलं. यानंतर चेन्नईच्या संघाचं छोटेखानी सेलिब्रेशन पार पडलं असलं तरीही कॅप्टन महेंद्रसिंह धोनी लगेच पुढच्या कामाला लागला आहे. आगामी टी-२० विश्वचषकासाठी धोनी भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून […]
ADVERTISEMENT
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचं विजेतेपद मिळवलेल्या महेंद्रसिंह धोनीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय. विशेषकरुन मागच्या वर्षी साखळी फेरीतचं आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नईने जबरदस्त मुसंडी मारत पहिल्यापासून आपला दबदबा कायम राखत विजेतेपद मिळवलं. यानंतर चेन्नईच्या संघाचं छोटेखानी सेलिब्रेशन पार पडलं असलं तरीही कॅप्टन महेंद्रसिंह धोनी लगेच पुढच्या कामाला लागला आहे.
ADVERTISEMENT
आगामी टी-२० विश्वचषकासाठी धोनी भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये सहभागी झाला आहे. टीम इंडियाने आगामी वर्ल्डकपसाठी आपला सराव सुरु केला असून धोनीचा रवी शास्त्री आणि इतर कोचिंग स्टाफसोबतचा फोटो बीसीसीआयने शेअर केलाय.
Extending a very warm welcome to the KING ?@msdhoni is back with #TeamIndia and in a new role!? pic.twitter.com/Ew5PylMdRy
— BCCI (@BCCI) October 17, 2021
Hello. We. Are. Here! #TeamIndia #T20WorldCup pic.twitter.com/Nco4LOOhMa
— BCCI (@BCCI) October 17, 2021
धोनीच्या या नवीन रुपाला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही चांगलीच पसंती दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआयने टी-२० वर्ल्डकपसाठी धोनीला मेंटॉर म्हणून काम करण्याची विनंती केली होती. धोनीच्या अनुभवाचा भारतीय संघाला फायदा होईल अशी बीसीसीआयला आशा आहे.
हे वाचलं का?
IPL BLOG: Love him or Hate Him…महेंद्रसिंह धोनी नावाचं अजब रसायन!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT