IPL 2023 : मुंबई इंडियन्स पुन्हा पहिल्या सामन्यात हरली; रोहित शर्मा टीमवर नाराज

मुंबई तक

ADVERTISEMENT

RCB won the match easily defeating Mumbai indians. After this defeat, captain Rohit Sharma gets angry on team's batsmen and bowlers well.
RCB won the match easily defeating Mumbai indians. After this defeat, captain Rohit Sharma gets angry on team's batsmen and bowlers well.
social share
google news

IPL 2023 Rohit sharma : आयपीएलमध्ये रविवारी दुसरा सामना विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्समध्ये झाला. मुंबईला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीने मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सलामीवीर रोहित शर्मा आणि ईशान किशन यांचा संघर्ष सुरू होता. टिळक वर्माने एकट्याने मुंबईला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. (Mumbai Indians again lost the first match; Rohit Sharma is angry with the team)

ADVERTISEMENT

IPL 2023 : चरणस्पर्श! धोनी समोर येताच अरिजीत सिंग पडला पाया, चाहत्यांची जिंकली मनं

पण ही खेळी व्यर्थ गेली. आरसीबीने हा सामना अगदी सहज जिंकला. आणि या पराभवानंतर कर्णधार रोहितने आपल्या फलंदाज आणि गोलंदाजांना चांगलंच सुनावलं. तो म्हणाला, ‘सुरुवात चांगली झाली नाही पण शेवटी तिलकने चांगला प्रयत्न केला. पण गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली नाही. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही, खेळपट्टी चांगली होती. आज तिलकने जे मोजके शॉट्स खेळले, त्याने खूप धाडस दाखवलं. सन्मानजनक टोटलपर्यंत पोहचवल्याबद्दल तिलकला सलाम. फलंदाजीसाठी ती चांगली खेळपट्टी होती. आम्ही आमच्या क्षमतेनुसार फलंदाजी केली नाही. आणखी 30-40 धावा केल्या असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं पण आम्ही स्ट्रगल करत राहिलो, असं रोहित शर्मा म्हणाला.

IPL 2023 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळ शून्यावर बाद होणारे खेळाडू कोण?

बुमराहबद्दल रोहित शर्मा म्हणाला,…

रोहित जसप्रीत बुमराहबद्दलही बोलला. तो म्हणाला, ‘बुमराह गेल्या सहा-आठ महिन्यांपासून नाही. मला त्याच्याशिवाय खेळायची सवय झालीय. आपण अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. बाकीचे प्लेयरही खूप दिग्गज आहेत जे यापूर्वी आयपीएल खेळले नव्हते. या मोसमातील हा फक्त पहिलाच सामना होता, पुढे बघण्यासारखं खूप काही आहे, असं तो म्हणाला.

हे वाचलं का?

मॅचबद्दल बोलायचं झाल्यास मुंबई संघाने 20 धावांवर ईशान किशन, कॅमेरून ग्रीन आणि रोहित शर्मा यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. 15 धावा करून सूर्यकुमार यादवही माघारी परतला. पण तिलक वर्माने एक बाजू धरून ठेवली. तो 46 चेंडूत 84 धावा करून नाबाद परतला. मुंबईने आरसीबीला 172 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात आरसीबीची सुरुवात चांगली झाली. फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली या सलामीच्या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. जेव्हा डु प्लेसिस 14.5 षटकांत बाद झाला होता. तोपर्यंत 148 धावा झाल्या होत्या. त्याने 43 चेंडूत 73 धावा केल्या.

डु प्लेसिस बाद झाल्यानंतर आलेला दिनेश कार्तिक खातेही न उघडता परतला. मुंबईला थोडी आशा दिसली. पण त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने तीन चेंडूंत त्या आशा धुळीस मिळवल्या. शेवटी विराट कोहलीने षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. कोहली 49 चेंडूत 82 धावा करून नाबाद परतला. तर मॅक्सवेलने तीन चेंडूत 12 धावा केल्या.

ADVERTISEMENT

­

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT