World Cup 2023: हार्दिक पांड्याबाबत मोठी अपडेट, टीम इंडियाला मोठा धक्का

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

odi world cup 2023 hardik pandya fitness upadte did he play semi final match ind vs eng 2023
odi world cup 2023 hardik pandya fitness upadte did he play semi final match ind vs eng 2023
social share
google news

Hardik Pandya Fitness Update : आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने (Team india) रविवारी इंग्लंडचा पराभव करून विजयाची डबल हॅट्ट्रीक साधली. या विजयासह आता टीम इंडियाचं सेमी फायनलमधील स्थानही पक्कं मानलं जात आहे. असे असतानाच आता हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) फिटनेसबाबत मोठी माहिती समोर आली आहे. हार्दिक पंड्या आता पुढील उरलेले तीन सामने खेळणार का? किंवा थेट सेमी फायनल सामन्यातच मैदानात उतरणार आहे? याबाबतची महत्वपुर्ण माहिती समोर आली आहे.(odi world cup 2023 hardik pandya fitness upadte did he play semi final match ind vs eng 2023)

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पुण्यात खेळवल्या गेलेल्या बांग्लादेशविरूद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. पायाने चौकार अडवताना हार्दिकला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर हार्दिक पंड्याला न्यूझीलंड आणि इंग्लंड विरूद्धच्या सामन्याला मुकावे लागले होते. इंग्लंडच्या पराभव केल्यानंतर टीम इंडियाचा पुढील सामना 2 नोव्हेंबरला श्रीलंकेविरूद्ध खेळायचा आहे. या सामन्यापुर्वीच हार्दिक पंड्या संघात सामील होणार आहे. मात्र सामन्यात खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

हे ही वाचा : MLA Disqualification case : ’31 डिसेंबरच्या आत निर्णय घ्या’, सुप्रीम कोर्टात नार्वेकरांना झटका

बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांड्या टीम इंडियाच्या संघात सामील होणार आहे. हार्दिक सध्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार घेत आहे. पण तो श्रीलंकेविरूद्ध सामन्यात मैदानात उतरेल की नाही हे सांगता येत नाही. पण तो संघात सामील होणार आहे,इतकं मात्र निश्चित असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. हार्दिक पंड्याची वापसी टीम इंडियासाठी खुशखबर असणार आहे. कारण पांड्याच्या वापसीमुळे संघाची ताकद वाढणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वर्ल्ड कपमधील कामगिरी

वर्ल्ड कपमधील आतापर्यंतच्या 4 सामन्यात त्याला फलंदाजीची क्वचितच संधी मिळाली होती. यामध्ये त्यांने फक्त 11 धावा केल्या आहेत. तर 22.60 च्या सरासरीने 5 विकेट घेतल्या आहेत. पण टीम इंडियाने फॅन्स त्याच्या मैदानाच्या वापसीची अपेक्षा लावून बसले आहेत.

हे ही वाचा : Maratha Reservation : ‘मी विष पिऊन मरते, पण जरांगेंचा…’, मराठा आंदोलक महिला हंबरडा फोडत काय म्हणाली?

दरम्यान टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये सलग 6 सामने जिंकले आहे.आता पुढील सामना 2 नोव्हेंबरला श्रीलंकेविरूद्ध असणार आहे. या सामन्यात श्रीलंका टीम इंडियाचा विजयरथ रोखणार का? की टीम इंडिया विजयाची मालिका कायम ठेवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT